Coronavirus Unlock : रत्नागिरीकरांनी पाळला कडकडीत लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:31 PM2020-07-01T13:31:30+5:302020-07-01T13:32:40+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत कठोर निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा केली आहे. घोषित केलेल्या लॉकडाऊनची आजपासून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंगळवारी नागरिकांनी गजबजून गेलेली रत्नागिरी बुधवारी शांत दिसत होती. प्रशासनाच्या लॉकडाऊनला रत्नागिरीकरांनीही प्रतिसाद देत कडकडीत लॉकडाऊन पाळले.

Ratnagirikar followed a strict lockdown | Coronavirus Unlock : रत्नागिरीकरांनी पाळला कडकडीत लॉकडाऊन

Coronavirus Unlock : रत्नागिरीकरांनी पाळला कडकडीत लॉकडाऊन

Next
ठळक मुद्देरत्नागिरीकरांनी पाळला कडकडीत लॉकडाऊनकाटेकोरपणे पालन, बाजारपेठेत शांतता

रत्नागिरी : जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत कठोर निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा केली आहे. घोषित केलेल्या लॉकडाऊनची आजपासून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंगळवारी नागरिकांनी गजबजून गेलेली रत्नागिरी बुधवारी शांत दिसत होती. प्रशासनाच्या लॉकडाऊनला रत्नागिरीकरांनीही प्रतिसाद देत कडकडीत लॉकडाऊन पाळले.

रत्नागिरीतील रस्त्यांवर केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने रस्त्यावर होती. दूध, भाजीपाला आणि छोटी दुकाने सोडून बाकी सर्व बाजारपेठ पूर्णतः बंद होती. लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. व्यापारी महासंघाने देखील शंभर टक्के दुकाने बंद ठेवली. यामुळे रामआळी, मारुतीआळी, गोखले नाका, लक्ष्मी चौक, मारुती मंदिर, साळवी स्टॉप आदी गजबजणारी ठिकाणे शांत होती.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून लॉकडाऊनचे पालन करण्यात आले. तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. शहरातील गजबजणारी ठिकाण पूर्णपणे शांत होती. व्यापाऱ्यांनीही लॉकडाऊन पाळल्याने बाजारपेठा शांत होत्या.

Web Title: Ratnagirikar followed a strict lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.