शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

रत्नागिरी : वन विभागाने सुरू केलेली कोकणातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 2:26 PM

कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत वन विभागाने गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे अर्थात व्हल्चर रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळी येथील उपाहारगृहे बंदच पडली आहेत.

ठळक मुद्देवन विभागाने सुरू केलेली कोकणातील गिधाडांची उपाहारगृहे बंद पडणार? कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळीतील उपाहारगृहांना सद्यस्थितीत टाळे

चिपळूण : कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत वन विभागाने गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे अर्थात व्हल्चर रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळी येथील उपाहारगृहे बंदच पडली आहेत.राज्यात नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत समावेश असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी स्थापन झालेली ही उपाहारगृहांची योजना खाद्याची कमतरता आणि जागेच्या अडचणीमुळे गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून कोकणात गिधाड सर्वेक्षण, संरक्षण आणि संवर्धनाबरोबरच त्यासाठीची पूरक वातावरण निर्मिती आणि डायक्लोफिनॅक औषधांवरील बंदी अंमलबजावणीच्या दृष्टीने वन विभाग काम करीत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी बहुतांश भागात गिधाडांचा वावर होता. मात्र, १९९०पासून त्यांच्या संख्येत अचानकपणे घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोकणातील संपूर्ण परिसराचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार यानुसार २००२मध्ये सर्वप्रथम दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची घरटी आणि पक्षी आढळले. त्यामुळे या ठिकाणापासून संवर्धन कार्यक्रम राबविण्यास सुरूवात झाल्यावर २००६पर्यंत जिल्ह्यात ७ घरटी आणि १४ पक्ष्यांची वाढ दिसली. मात्र, त्यानंतर त्यामध्ये वाढ न होता, श्रीवर्धन व चिरगाव येथे वसाहती आढळल्या होत्या.यापूर्वी कोकणात यापेक्षाही अधिक गिधाडांच्या वसाहती आढळून आलेल्या आहेत. मात्र, जनावरांना झालेली बोटूलिझमची लागण, जनावरे कत्तलखान्यात पाठवण्याचे वाढलेले प्रमाण, मृत जनावरे जमिनीत पुरण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे खाद्याअभावी गिधाडांच्या संख्येला ब्रेक लागला आहे.निसर्गातील सफाई कर्मचारीगिधाडे ही निसर्गातील सफाई कर्मचारी असतात. गिधाडे ही अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावरती पिसे नसतात. डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांसाचे लचके तोडणे त्यांना सहज शक्य होते.जनावरांचे प्रमाण कमीपूर्वी जनावरे मृत झाली की, ती उघड्यावर टाकली जात असत. मात्र, आता कोकणात पशुपालन हा उद्योगच संकटात आला आहे. त्यामुळे जनावरांचे प्रमाण कमी झाले असून, त्याचाही परिणाम गिधाडांवर झाला आहे.गिधाडांच्या अनेक जातीगिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींची गिधाडे ही मृतदेहावरच अवलंबून असतात. तरी या सर्व जाती एकमेकांच्या सहाय्याने काम करत असतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. या गिधाडांमधील एक इजिप्शियन गिधाड नावाची जात आहे. या जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य ते सहज हेरू शकतात.राज गिधाडावर नजरबहुतेक गिधाडांची राज गिधाडावर नजर असते. खाद्यापाशी पोहोचल्यावर गिधाडे बराचवेळ वाट बघत असतात. ही सर्व गिधाडे राज गिधाड येण्याची वाट बघत असतात. मृत प्राण्याची कातडी बहुधा अत्यंत जाड झालेली असते व बहुतांशी गिधाडांना ती भेदणे आवाक्याबाहेरचे असते. राज गिधाडाने येऊन पहिले काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचे काम चालू होते व पाहता पाहता पूर्ण मृतदेहाचा अक्षरक्ष: फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.प्रजाती नष्ट होण्याची भीतीभारतात गेल्या १५ ते २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती. परंतु, गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की, आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय, अशी भीती पक्षी निरीक्षक व सर्व पक्षीप्रेमींना वाटते आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचं खाद्य कमी झालेलं नाही.औषधे, रसायनांचा फटकागिधाडांच्या संख्येला मुख्य फटका बसला आहे तो औषधे व रसायनांचा. पाळीव प्राण्यांना ह्यडायक्लोफिनॅकह्ण नावाचे औषध देतात. हे औषध घेतलेले मेलेले प्राणी खाल्ल्यामुळे गिधाडांमध्ये ते औषध जाते. त्यामुळे गिधाडांच्या शरीरात अनेक व्याधी होऊन ती मरतात. भारत सरकारने या औषधावर बंदी आणली आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गRaigadरायगड