शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

रत्नागिरी : पाणीप्रश्नावरून नगर परिषद प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:04 PM

रत्नागिरी शहरात खराब वितरण वाहिन्यांमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पुरवठ्यावर दुर्लक्ष होत आहे, असा ठपका ठेवत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रश्नावरून सभागृहात रणकंदन माजले.

ठळक मुद्देपाणीप्रश्नावरून नगर परिषद प्रशासन धारेवरसंबंधित विभागांची लवकरच बैठक घेण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात खराब वितरण वाहिन्यांमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पुरवठ्यावर दुर्लक्ष होत आहे, असा ठपका ठेवत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रश्नावरून सभागृहात रणकंदन माजले.

पुढील आठवड्यात पाणी विभाग कर्मचारी, नगर परिषद पदाधिकारी, जीवन प्राधिकरणचे अधिकारी, यांची संयुक्त बैठक घेऊन पाणी समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नगराध्यक्ष योगेश तथा राहुल पंडित यांनी दिले.रत्नागिरी शहरात गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुनाट झाल्याने जागोजागी फुटल्या आहेत. तसेच शीळ धरणावरून साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीपैकी सुमारे ५०० मीटर लांबीची जलवाहिनी जागोजागी गंजल्याने फुटली आहे. त्यामुळे असंख्य ठिकाणी पाणी गळती होत आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात मुबलक पाणी असताना केवळ वितरण यंत्रणा कुचकामी होत असल्याने पुरेसे पाणी रत्नागिरीवासीयांना मिळणे अशक्य झाले आहे, अशा भावना सदस्यांनी मांडल्या.जून महिन्यात व सुरू असलेल्या जुलै महिन्यातही शहरातील अनेक भागात कमी दाबाने मिळणारे पाणीही बंद झाले. शहरातील ३०पैकी सुमारे २० वॉर्डमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. अनेक ठिकाणी पावसात नळाला तीन ते चार दिवस पाणीच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी नगरसेवकांचे दरवाजे ठोठावले व अपेक्षेप्रमाणे नगर परिषद सभेत पाणीटंचाई प्रश्नाचे तीव्र पडसाद उमटले.

या वादळी चर्चेत उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर, सेना गटनेते बंड्या साळवी, सेना नगरसेवक राजन शेट्ये, भाजपचे नगरसेवक सुशांत चवंडे, राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर, नगरसेवक रोशन फाळके, विकास पाटील, उमेश कुळकर्णी यांच्यासह सर्वच नगरसेवकांचा सहभाग होता.पाणी विभागावर अंकुश नाही!रत्नागिरी शहरात कमी दाबाने पाण्याची समस्या गेल्या आठ वर्षांपासून आहे. शहरात सुमारे दहा हजार नळ जोडण्या आहेत. आता राज्य शासनाकडून नगर परिषदेसाठी ६३ कोटींची सुधारित नळपाणी योजना मंजूर झाली असून, ही योजना पूर्ण होण्यास अजून २ वर्षे लागणार आहेत. त्यामुळे असलेल्या जुन्या वितरण वाहिन्यांची दुरुस्ती करून शहरवासीयांची पाण्याची किमान गरज भागवणे आवश्यक आहे. पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणाचे नियंत्रणच नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी