शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रत्नागिरी : खेडमध्ये अधिकाऱ्यानेच केला पशुधनचा अनधिकृत साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:28 PM

शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी आलेल्या औषधांचा सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यानेच अनधिकृतपणे साठा करून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देखेडमध्ये अधिकाऱ्यानेच केला पशुधनचा अनधिकृत साठापंचनामा करून गाळा सील, सिंमेट व्यवसायासाठी गाळा

खेड : शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी आलेल्या औषधांचा सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यानेच अनधिकृतपणे साठा करून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील शिव फाटा येथील एका खासगी मालकीच्या गाळ्यात हा औषधसाठा पकडण्यात आला आहे. पशुधन विकास अधिकारी विनया जंगले यांनी पंचनामा करून हा औषधसाठा सील केला आहे.खेड तालुक्यातील शिव फाटा येथील इनरकर यांच्या मालकीचा गाळा खेड पंचायत समितीचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आर. एस. जाधव यांनी दीड वर्षापूर्वी भाड्याने घेतला होता. या गाळ्याचा उपयोग ते सिमेंट व्यवसाय करण्यासाठी करणार होते.

खेड तालुक्यातील खाडीपट्टा येथील तुंबाडमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात आर. एस्. जाधव यांची नेमणूक आहे. त्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेल्या औषधांचा साठा तुंबाडमध्ये दवाखान्यात न ठेवता या गाळ्यात ठेवला होता, अशी कबुली यांनी दिली आहे. त्या ठिकाणाहून ते त्या औषधांची परस्पर विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.या गाळ्यातून विशिष्ट स्वरूपाची दुर्गंधी येत असल्याने गाळ्याचे मालक इनरकर यांना शंका आली. त्यांनी गाळा उघडून पाहिल्यानंतर औषधांचा साठा दिसला. त्यांनी या घटनेची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुरुनाथ पारसे यांना दिल्यानंतर खेड पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विनया जंगले यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी या गावातील सरपंच, पोलीसपाटील तसेच इतर प्रतिष्ठित ग्रामस्थांसमोर पंचनामा केला.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी