शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल दोघा अज्ञातानी फोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 21:17 IST

Ratnagiri: चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबइ गोवा महामार्गावरील खड्डे पहा असा टोला राज ठाकरे लगावलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी राजापूर -  हातिवले येतील टोल नाका काही अज्ञातानी फोडल्याची घटना घडली आहे.

- विनोद पवारराजापूर - दोन दिवसांपुर्वी मुंबइ गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यानी शासनावर आसुड ओढताना चांद्रयान तीन चंद्रावर पाठवण्या एवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते , चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबइ गोवा महामार्गावरील खड्डे पहा असा टोला लगावलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी राजापूर -  हातिवले येतील टोल नाका काही अज्ञातानी फोडल्याची घटना घडली आहे.

गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच सध्या मुंबइ गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली आहे . येणार्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्याची लगबग सुरु असतानाही अद्यापही शासन व प्रशासन महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या कोकणवासियानी आपला राग राजापूर - हातिवले येथील टोल नाक्यावर काढला आहे.

गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातानी  घोषणा देत अचानक हातीवले येथील टोलनाक्याकडे आपला मोर्चा वळवत या टोलनाक्यावरील केबीनची मोठ्याप्रमाणावर मोडतोड केली असुन केबीनच्या काचाही फोडल्या आहेत . मुंबइ गोवा माहामार्गाचे काम करणार्या ठेकेदाराची मनमानी व गेली १७ वर्ष सुरु असणारे काम त्यातच यावर्षी महामार्गाची झालेली चाळण यामुळे कोकणवासियान्मधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसानी सायंकाळी उशीरा दोघाना चौकशीसाठी ताब्यात घेतले असुन चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येइल असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

मुंबई गोवा मार्गाचे काम रखडलेले असून तसेच रस्त्याची एकूण झालेले चाळण ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्यात पीडब्ल्यूडी तसेच कॉन्ट्रॅक्टर यांचा मनमानी कारभार यामुळे याआधी सर्वसामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता आणि अखेर दोघा अज्ञातानी  यांनी आज सायंकाळी चार वाजून 45 मिनिटांनी  राजापूर हातिवले येथील टोल नाका फोडला

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtollplazaटोलनाकाMaharashtraमहाराष्ट्र