रत्नागिरी : एकतर्फी प्रेमातून तरूणाचा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला, बेशुद्ध मुलगी रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:54 IST2018-01-08T13:50:18+5:302018-01-08T13:54:05+5:30

प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे घडला. हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या जखमी मुलीला संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ratnagiri: A teenage girl, a teenaged girl assaulted, unconscious girl in hospital | रत्नागिरी : एकतर्फी प्रेमातून तरूणाचा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला, बेशुद्ध मुलगी रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

रत्नागिरी : एकतर्फी प्रेमातून तरूणाचा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला, बेशुद्ध मुलगी रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

ठळक मुद्दे बेशुद्ध जखमी मुलगी रूग्णालयात दाखल एकतर्फी प्रेमातून तरूणाचा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला

देवरूख (रत्नागिरी) : प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे घडला. हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या जखमी मुलीला संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रोशन भीमदास कदम (२१) असे या तरूणाचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. ती त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती. या रागातून त्याने आज सकाळी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात ती बेशुद्ध झाली.

तिला लगेचच संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याने तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोघांनी एकमेकांवर हल्ला केला असल्याची माहिती सर्वप्रथम व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून पसरली होती. मात्र त्याच्यावर हल्ला झालेला नसून, केवळ अल्पवयीन मुलगीच जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
 

Web Title: Ratnagiri: A teenage girl, a teenaged girl assaulted, unconscious girl in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.