शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

रत्नागिरी : मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करावी, पंचायत समितीचा अहवाल : शिक्षण विभागाकडे लवकरच सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 4:53 PM

देवाचे गोठणेमधील शाळेत आलेल्या त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करण्यात यावी असा अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला असल्याची माहिती राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली.

ठळक मुद्देमद्यधुंद शिक्षकावर कारवाई करावी, पंचायत समितीचा अहवाल शिक्षण विभागाकडे लवकरच सादर

राजापूर : देवाचे गोठणेमधील शाळेत आलेल्या त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करण्यात यावी असा अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला असल्याची माहिती राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली.नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवाचे गोठणेमधील ठोमरेवाडीतील शाळेत कार्यरत असणारा हा शिक्षक मद्यपान करुन आला होता. त्यावेळी शाळेत उपस्थीत असलेल्या पालकांनी त्या शिक्षकाला राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणून त्याची तपासणी करवली होती.

त्यामध्ये त्याने मद्य सेवन केल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले होते. त्याची राजापूर पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मागील दोन वर्षे त्या शिक्षकाच्या नशेबाबत तक्रारी होवूनदेखील त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने राजापूर पंचायत समिती प्रशासन व शिक्षण विभागावर टिका करण्यात आली होती.

त्यामुळे यावेळी पंचायत समिती प्रशासनाने त्या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल जिल्हा परीषद शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती येथील सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली. त्यामुळे आता त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई होणार हे निश्चीत आहे.दरम्यान इयत्ता चौथीपर्यंत एक शिक्षकी असलेल्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये म्हणुन अन्य शाळेतील एक शिक्षक कामगिरीवर देण्यात आला आहे, अशी माहिती राजापूर पंचायत समिती प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद