रत्नागिरीचे 'एसपी' आणि जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' या जोडीने धरला पंजाबी नृत्यावर ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 16:23 IST2021-12-17T16:21:45+5:302021-12-17T16:23:54+5:30

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनात या जोडीने पंजाबी नृत्य केले.

Ratnagiri SP and Zilla Parishad CEO hold contract on Punjabi dance | रत्नागिरीचे 'एसपी' आणि जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' या जोडीने धरला पंजाबी नृत्यावर ठेका

रत्नागिरीचे 'एसपी' आणि जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' या जोडीने धरला पंजाबी नृत्यावर ठेका

रत्नागिरी : एरवी सरकारी कामात मग्न असणारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड या जोडीने पंजाबी नृत्य करुन रंगमंच गाजवला. निमित्त होते, जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनाचे.

डॉ. मोहितकुमार गर्ग आणि डॉ. इंदुराणी जाखड या दोघांनीही आपापल्या विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. कोरोना काळात पोलिसांनी उत्तम काम केले आहे. जिल्हा परिषदेनेही लसीकरणात जोरदार मुसंडी मारली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील खात्यांच्या उत्तम कारभारासाठी हे दोन्ही अधिकारी नावाजले जात आहेतच, मात्र यावेळी त्यांचे कौतुक होत आहे ते त्यांनी केलेल्या नृत्यासाठी.

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनात या जोडीने पंजाबी नृत्य केले. सर्वच कर्मचाऱ्यांनी त्याचे विशेष कौतुक केले. संपूर्ण स्नेहसंमेलनात हा परफॉर्मन्स आणि या जोडीतील सिंक्रोनायझेशन याचीच चर्चा होती.

Web Title: Ratnagiri SP and Zilla Parishad CEO hold contract on Punjabi dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.