शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत : रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 17:50 IST

रत्नागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. याबाबत दिल्लीत पार्लमेंटरी बाेर्डाची बैठक सुरू असून, ...

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. याबाबत दिल्लीत पार्लमेंटरी बाेर्डाची बैठक सुरू असून, त्या बैठकीत याेग्य ताे निर्णय हाेईल. या मतदारसंघात मंत्री उदय सामंत, किरण सामंत हे महायुती म्हणून काम करतील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत सांगितले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यालयाचे रत्नागिरीत रविवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या उद्घाटन साेहळ्याला महायुतीचे आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित हाेते. उद्यापासून महायुतीचा उमेदवार नरेंद्र माेदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागेल. मतदारसंघात प्रचाराच्या दृष्टीने जे करावे लागेल ते सर्व याेजनाबद्ध करण्याबाबत या कार्यालयातून काम हाेईल, असे त्यांनी सांगितले.

महायुतीमध्ये काही ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाण आहे तर काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ असून, एका ठिकाणी शिटी ही निशाणी आहे. त्यामुळे महायुतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवारांना चिन्ह अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही वरिष्ठ मंडळी महायुतीला याेग्य ताे निर्णय घेतील, आम्हाला आवश्यक असणारे निर्णय ते नक्की घेतील. हा निर्णय लवकरच हाेणे अपेक्षित आहे. या उमेदवारीबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही उत्कंठा लागलेली आहे. मात्र, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचेही मंत्री चव्हाण म्हणाले.ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गात महायुतीचे मेळावे झाले त्याला महायुतीचे घटक पक्ष हाेते. रत्नागिरीतही कार्यकर्ते आणि त्यांच्यासाेबत असणाऱ्या सर्वांच्या शुभेच्छा महायुतीच्या पाठीशी आहेत. रत्नागिरीतील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मंत्री उदय सामंत, किरण सामंत हे सर्वजण महायुतीचे काम करत आहेत. उदय सामंत यांच्याकडे पक्षाची माेठी जबाबदारी आहे. पक्षाकडून ज्याठिकाणी त्यांचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, त्याठिकाणी समन्वय राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना वेळ देण्यास मिळत नाही. मात्र, याठिकाणची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात असल्याने १५ तारखेनंतर त्यांनी याठिकाणी एकत्रित मेळावे घेतले जातील असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपाlok sabhaलोकसभा