शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजपासून चित्रपट महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:06 IST

रत्नागिरी : कोकणातील रोजगार निर्मितीसाठी कलाकार, नागरिक आणि शासन व्यवस्था एकत्र येऊन चळवळ उभी राहण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंचातर्फे काेकण ...

रत्नागिरी : कोकणातील रोजगार निर्मितीसाठी कलाकार, नागरिक आणि शासन व्यवस्था एकत्र येऊन चळवळ उभी राहण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंचातर्फे काेकण चित्रपट महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. हा महाेत्सव ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हाेणार आहे. दि. १६ डिसेंबर राेजी मालवण येथे पारिताेषिक वितरण साेहळा हाेणार आहे.सिंधुरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. या महाेत्सवांतर्गत दि. ११ डिसेंबर राेजी दुपारी दाेन वाजता ग्रंथालय ते राधाबाई शेट्ये सभागृह शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २:३० वाजता गाेगटे जाेगळेकर महाविद्यालयात उद्घाटन समारंभ हाेणार आहे. या समारंभाचे सूत्रसंचालन महाेत्सवाचे समन्वयक डाॅ. आनंद आंबेकर करणार असून, स्वागत, प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी आणि प्रस्तावना विजय पाटकर करणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन साेसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सिंधुरत्न कलावंत मंचाचे कार्यवाह विजय राणे, सहकार्यवाह प्रकाश जाधव उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर परिसंवाद हाेणार असून, त्यामध्ये विजय पाटकर आणि विजय राणे सहभागी हाेणार आहेत.

दिनांक १२ राेजी सकाळी ११ वाजता भारत शिक्षण मंडळाच्या डी. जे. के. महाविद्यालयाच्या इंटरॅक्टिव्ह सभागृहात चित्रपट स्क्रिनिंग हाेणार आहे. दिनांक १३ व १४ राेजी सकाळी ११ वाजता गाेगटे जाेगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई सभागृहात चित्रपट स्क्रिनिंग, दिनांक १५ राेजी सकाळी ११ वाजता भारत शिक्षण मंडळाच्या डी. जे. के. महाविद्यालयात चित्रपट स्क्रिनिंग हाेणार आहे. त्यानंतर रत्नागिरीतील महाेत्सवाचा भारत शिक्षण मंडळाच्या डी. जे. के. महाविद्यालयात समारोप समारंभ हाेणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग