शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टी, संपत्तीत किती लाखांची झाली वाढ..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 12:24 IST

पत्नीची जंगम मालमत्ता अधिक

रत्नागिरी : उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १६) उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत सादर केलेल्या मालमत्ता आणि संपत्तीविषयक शपथपत्रात त्यांनी स्थावर आणि जंगम मिळून एकूण ४ कोटी ९० लाख ३४ हजार ८२९ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यांची पत्नी शामल या जंगम मालमत्तेत त्यांच्यापेक्षा १६ लाख ७३ हजारांनी श्रीमंत आहेत.विनायक राऊत यांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात स्थावर मालमत्ता ३१ लाख ८७ हजार २९८ असल्याचे नमूद केले होते. यावेळी त्यांची जंगम मालमत्ता ६५ लाख ३४ हजार ८२९ रुपये एवढी आहे. यावेळी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३३ लाख ३४ हजार ५३१ रुपयांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या पत्नीची ८२ लाख ८ हजार ५८३ इतकी जंगम मालमत्ता आहे.

तसेच गेल्या वेळी विनायक राऊत यांची स्थावर मालमत्ता ३ कोटी ८७ लाख एवढी होती. यावेळी ती ४ कोटी २५ लाख झाली आहे. यावेळी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३८ लाखांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ७४ लाखांची मालमत्ता आहे.गेल्यावेळी विनायक राऊत यांच्याकडे २२० ग्रॅम सोने (६.५० लाख किमतीचे) होते. आताही तेवढेच सोने असून त्याची किंमत १३ लाख रुपये इतकी झालीआहे. पत्नी शामल यांच्याकडे गेल्यावेळी २४० ग्रॅम सोने होते. यावेळी त्यांच्याकडे ३४० ग्रॅम सोने आहे.२०१९ च्या निवडणुकीवेळी विनायक राऊत यांच्याकडे स्काॅर्पिओ वाहन होते. यावेळी त्यांच्याकडे ३७ लाख ४१ हजार ३२१ रुपये किमतीचे फाॅर्च्युनर हे वाहन आहे.२०१९ च्या निवडणुकीवेळी विनायक राऊत यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून एकूण ४ कोटी १८ लाख ८७ हजार रुपयांचे ते मालक होते. यावेळी त्यांच्याकडे एकूण ४ कोटी ९० लाख ३४ हजार ८२९ रुपयांची मालमत्ता आहे. म्हणजे यावेळी त्यांच्या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांत एकूण ७१ लाख ४७ हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीवेळी त्यांच्यावर २८ लाख रुपयांचे कर्ज होते. यावेळी २० लाख ९७ हजार १०० एवढे कर्ज आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vinayak Rautविनायक राऊत