शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रत्नागिरी : धक्कादायक ! झपाट्याने कमी होत आहे रत्नागिरीतील वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:41 PM

वनक्षेत्र टिकले पाहिजे, वनसंपदेचे रक्षण झाले पाहिजे, अशी हाकाटी घातली सर्वच स्तरांवरून घातली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र मात्र गेल्या दोन वर्षात तब्बल ३० चौरस किलोमीटरने कमी झाल्याची माहिती खरवते - दहीवली येथील पर्यावरण शास्त्राचे प्रा. आशिष अशोक लाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी वनक्षेत्र गेल्या दोन वर्षात ३० चौरस किलोमीटरने कमीटिकवण्यासाठी शाश्वत शहरांसाठी वने हे नवे धोरण

 अरुण आडिवरेकररत्नागिरी : वनक्षेत्र टिकले पाहिजे, वनसंपदेचे रक्षण झाले पाहिजे, अशी हाकाटी घातली सर्वच स्तरांवरून घातली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र मात्र गेल्या दोन वर्षात तब्बल ३० चौरस किलोमीटरने कमी झाल्याची माहिती खरवते - दहीवली येथील पर्यावरण शास्त्राचे प्रा. आशिष अशोक लाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.वन परिस्थिती अहवालानुसार सन २०१५मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे वनक्षेत्र ४१९६ चौरस किलोमीटर इतके होते. हेच क्षेत्र सन २०१७मध्ये ४१६६ चौरस किलोमीटर इतके झाले आहे.कमी झालेल्या वनांमध्ये मध्यम घनदाट आणि खुल्या वनांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. नष्ट होत चाललेले हे वन टिकवण्यासाठी शाश्वत शहरांसाठी वने हे नवे धोरण आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८२०८ चौरस किलोमीटर इतके आहे. या क्षेत्रफळामध्ये वनांचा विचार करता अति घनदाट वने, मध्यम घनदाट आणि खुले वन अशा भागात वन क्षेत्र विभागले गेलेले आहे.

मात्र, दिवसेंदिवस हे क्षेत्र कमी होत चालले असून, वृक्षांची तोड करून त्याठिकाणी टोलेजंगी इमारती बांधल्या जात आहेत. वृक्षतोड होत नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत असले तरी वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वन परिस्थिती अहवालाच्या आकडेवारीनुसार रत्नागिरीतील वनक्षेत्र कमी होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यम घनदाट व खुल्या वनांचे क्षेत्रफळ कमी झाल्याचे दिसून येते. सन २०१५ मध्ये क्षेत्रफळाच्या ५१.१२ टक्के इतके वनक्षेत्र होते. सन २०१७मध्ये ते ५०.७६ टक्के इतके क्षेत्रफळ झाले असल्याचे आशिष लाड यांनी सांगितले.

मात्र, जिल्ह्यातील अतिघनदाट क्षेत्र आजही टिकून असल्याचे दिसून येते. वनांचे कमी होत जाणारे क्षेत्र पाहता आता शाश्वत शहरांसाठी वनेह्ण ही योजना जाहीर केली आहे.यानुसार ही वनेच शहरांना स्वच्छ, निरोगी आणि आनंदी बनवू शकतील. त्याचबरोबरच इमारतीच्या बाजूला वृक्षांचे आच्छादन असल्यास इमारतीच्या आतील बाजूचे तापमान ८ अंश सेल्सिअसने कमी होते. तेथे वातानुकुलीत यंत्राची आवश्यकता भासणार नाही.मध्यम व खुले वनक्षेत्रात घटरत्नागिरी जिल्ह्यातील सन २०१५ आणि सन २०१७चे प्रमाण पाहता अतिघनदाट वनांचे क्षेत्र ३३ चौरस किलोमीटर इतके कायम आहे. सन २०१५मध्ये मध्यम घनदाट क्षेत्र १९०९ चौरस किलोमीटर इतके होते ते १८९२ चौरस किलोमीटर तर खुले वन २२५४ चौरस किलोमीटर इतके होते. हे क्षेत्र आता २२४१ चौरस किलोमीटर झाले आहे.शाश्वत वने : उपयुक्त आणि सौंदर्यहीशाश्वत शहरातील वने ही वातावरणातील प्रदूषके शोषून घेण्याचे कार्य करतात. शहरी वने ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करतात. ही वने विविध पशू-पक्षी यांची आश्रयस्थाने असतात. ज्यामुळे जैवविविधतेचे संतुलन साधले जाते. शहरातील वने वृक्षाच्छादन तर वाढवतातच तसेच शहराचे सौंदर्यदेखील वाढवतात. 

टॅग्स :forest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरी