शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

रत्नागिरी : चैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:17 IST

शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.

ठळक मुद्देचैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सवरत्नागिरी जिल्ह्यातील आगळा उत्सव,  भक्तिभावाने दीड महिना चालणारा उत्सव

रत्नागिरी : शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचे प्राचीन सूर्यमंदिर आहे. शिमगोत्सवाला शंभरपेक्षा अधिक वर्षे लोटली आहेत. कालपरत्वे उत्सवाचे रूपही पालटले असून, ते व्यापक झाले आहे. दीड महिन्याच्या कालावधीत बारा वाड्यांमधील ६४० घरांमध्ये पालखी पूजेकरिता येत असल्याने भाविक दर्शनाकरिता हमखास घरी येतात.

होळी पौर्णिमेच्या एक दिवस आधी ग्रामदेवतेला रूपे लावून पालखीत देव विराजमान होतात. त्यानंतर पालखी होळी तोडण्याच्या ठिकाणी नेली जाते. होळी उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. होळी पौर्णिमेच्या आधी सुरू झालेला हा शिमगोत्सव आजही सुरू असून १५ एप्रिलला सांगता होणार आहे.ढोकमळे, मुरूगवाडा, उंबरवाडी, देवपाटवाडी, लावगणवाडी, नवेदरवाडी, कुंभारवाडी, बाजारपेठ, गुरववाडी, चिंचवणे, पेडणेकरवाडी, काजिरभाटी, मोरेवाडी येथील घरोघरी जाऊन ग्रामदेवतेची पालखी पूजा स्वीकारते. हा उत्सव जवळपास दीड महिना सुरु असतो. जिल्ह्यातील एवढा दीर्घ काळ चालणारा हा एकमेव शिमगोत्सव असावा.कार्यक्रमाची रेलचेलसुरूवातीला शिमगोत्सवाचे स्वरूप मर्यादित होते. मात्र, आता त्याला व्यापकता आली आहे. प्रत्येक वाडीसाठी किमान दोन ते चार दिवस देण्यात आले आहेत. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत हा उत्सव चालणार असून, १५ रोजी पालखी मंदिरात परतणार आहे. प्रत्येक वाडीत देवीचा मांड साजरा करण्यात येत असल्यामुळे कार्यक्रमांसमवेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू, नमन, नाटक आयोजित करण्यात येत आहे.विशिष्ठ धर्मापुरताच मर्यादित नाहीश्री आदित्यनाथ मंदिर प्राचीन आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाने नक्कीच शतक पाहिले आहे. गावातील मुस्लिम बांधवदेखील दरवर्षी भक्तिभावाने होळीसाठी नारळ अर्पण करीत असतात, त्यामुळे हा सण केवळ विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित नाही. वाडीनिहाय विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

दीड महिन्याचा शिमगोत्सव उत्साहाने व शांततेत साजरा केला जातो. भाविकांची उपस्थिती हे शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शिमगोत्सवाची सांगता पालखी मंदिरात परतल्यानंतर रूपे काढून ठेवली जातात.- सुनील रेवाळे, सचिव,श्री आदित्यनाथ, देवी भगवती माता देवस्थान कमिटी, नेवरे. 

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणRatnagiriरत्नागिरी