शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण मोबदल्यासाठी रत्नागिरी, संगमेश्वरसाठी २६ कोटी रूपये प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:34 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादीत केलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर दोन तालुक्यांमधील एकूण ३४ गावांसाठी वाढीव मोबदल्याच्या एकूण ४९ कोटी रकमेपैकी २६ कोटींचा मोबदला नुकताच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, उर्वरित २३ कोटी लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देचौपदरीकरण मोबदल्यासाठी रत्नागिरी, संगमेश्वरसाठी २६ कोटी रूपये प्राप्तउर्वरित २३ कोटींसाठी अजूनही प्रतीक्षा

रत्नागिरी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादीत केलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर दोन तालुक्यांमधील एकूण ३४ गावांसाठी वाढीव मोबदल्याच्या एकूण ४९ कोटी रकमेपैकी २६ कोटींचा मोबदला नुकताच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, उर्वरित २३ कोटी लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रत्नागिरी तालुक्यातील १२ आणि संगमेश्वर तालुक्यांतील २२ अशा एकूण ३४ गावांचा समावेश आहे. त्यापैकी रत्नागिरीतील चार आणि संगमेश्वरमधील सहा अशा एकूण दहा गावांचा निवाडा पहिल्या टप्प्यात, तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १९ गावांचा निवाडा जाहीर करण्यात आला.

या सर्व २९ गावांसाठी शासनाकडून भरपाईची एकूण ३९७ कोटी ३ लाख ५४ हजार ८०२ इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती, या रकमेपैकी ३८१ कोटी रूपयांचा निधी मार्चमध्ये प्राप्त झाला आहे. यापैकी २०३,३३,७८,३८६ इतका निधी रत्नागिरी तालुक्यासाठी, तर १७८,५२,८०,६९७ एवढी रक्कम संगमेश्वर तालुक्यासाठी वितरीत करण्यात आली होती.रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, चरवेली, कोठारेवाडी या चार गावांचा तसेच संगमेश्वरमधील निढळेवाडी अशा एकूण ५ गावांंचा निवाडा पुढे ढकलण्यात आला होता. त्यासाठी ९३,२२,८६,६२५ इतक्या रकमेची मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार ही रक्कमही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काही खातेदारांच्या जमिनीचे अधिक क्षेत्र या संपादनात गेल्याने त्यांनी फेर मोजणीसाठी निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते.त्यानुसार रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील वाढीव मोबदल्याची ४९ कोटी इतकी रक्कम होत होती. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यासाठी ३७ कोटी, तर रत्नागिरी तालुक्यासाठी १२ कोटी रूपयांचा वाढीव मोबदला जाहीर करण्यात आला होता.

मात्र, हा निधीही रेंगाळला होता. त्यापैकी २६ कोटीचा निधी काही दिवसांपूर्वीच उपविभागीय कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यातील ५ कोटींचा निधी रत्नागिरीसाठी, तर २१ कोटींचा निधी संगमेश्वर तालुक्यात वितरीत करण्यात येणार आहे.उर्वरित २३ कोटींपैकी रत्नागिरीला ७ कोटींची, तर संगमेश्वरला १६ कोटींच्या निधीची अद्याप प्रतीक्षा आहे. हा निधीही लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. कोकण रेल्वेप्रमाणेच महामार्ग रूंदीकरणासाठी जागा देण्यालाही लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कोठेही जागेअभावी काम थांबलेले नाही. काही किरकोळ ठिकाणीच वाद झाले.रखडलेले पैसेरत्नागिरी तालुक्यातील गावे (१२) : झरेवाडी, नागलेवाडी, मराठेवाडी, तारवेवाडी, निवळी, रावणंगवाडी, हातखंबा, खानू, चरवेली, कोठारेवाडी, पाली, पाली बाजारपेठ. संगमेश्वर तालुक्यातील गावे (२२ ) : मानसकोंड, तळे, कोळंबे, कोंडआंबेड, ओझरखोल, आंबेडबुद्रुक, आरवली, हरेकरवाडी, तुरळ, गोळवली, धामणी, आंबेडखुर्द, कसबा-संगमेश्वर, रामपेठ, वाडा नावडी, माभळे, कुरधुंडाखुर्द, कुरधुंडा, सोनगिरी, वांद्री, कांटे, निढळेवाडी.गावांचा निवाडा उशिरानेरत्नागिरी तालुक्यातील चरवेली, कोठारेवाडी, पाली, पाली बाजारपेठ या चार गावांमधील ग्रामस्थांच्या हरकतींमुळे या गावांचा निवाडा उशिरा तसेच संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी या गावाचे सर्वेक्षण काही निकषांमध्ये बदल झाल्याने पुन्हा करण्यात आले.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी