शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Ratnagiri: परशुराम घाटात लोखंडी जाळ्यांचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 05:26 IST

Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंगवॉल उभारण्यात येत आहे.

चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंगवॉल उभारण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्याचे महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत. परशुराम घाटात गेल्या दोन ते तीन वर्षांत भराव टाकून व एका बाजूला डोंगर कटाई करून रुंद केलेल्या मार्गावर छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. घाटात भरावाच्या ठिकाणी रस्ता खचणे व संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंत असलेल्या डोंगराच्या बाजूकडील दरडी काेसळत आहेत. घाटात ड्रिलद्वारे लोखंडी रॉड टाकून त्याचे मजबुतीकरण परशुराम घाटात उपाययोजना केल्या जात आहेत. कोकण रेल्वेने दरडीच्या ठिकाणी ज्या पद्धतीने जाळ्या उभारून मार्ग सुरक्षित केला आहे.अगदी त्याच धर्तीवर घाटातील ४० मीटर उंच व ९०० मीटरच्या अंतरात लोखंडी जाळी मारून दरडीचा भाग सुरक्षित केला जात आहे. घाटात ड्रिलद्वारे लोखंडी रॉड टाकून त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. हे काम उत्तराखंडमधील शासकीय कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. 

संरक्षक भिंत कमकुवतघाटातील रस्ता रुंद करण्यासाठी सुमारे ७० ते ८० टक्के भागात मूळ जुन्या रस्त्यावर भराव टाकून हा भाग १० ते १५ फूट उंच करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला डोंगर कटाई करून कमकुवत संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी