शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना महासंचालक पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 16:02 IST

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले याबद्दल पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देरत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना महासंचालक पदक नक्षलवादी भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल

रत्नागिरी : नक्षलवादी भाग अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून दोन वर्षे कार्यरत असलेले रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या पहिल्याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना पोलीस खात्यातील मानाचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.इंगळे यांना सन २०१५मध्ये गडचिरोली येथे पहिलीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. येथील पोलीस विभागाला सदैव सतर्क राहावे लागते. याचबरोबर त्यांनी आदिवासी भागातील युवावर्गासाठी केलेल्या विशेष कार्याची दखलही या सन्मानासाठी घेण्यात आली आहे.

१ ते १२ जानेवारी असे तब्बल १२ दिवस त्यांनी आदिवासी मुलांकरिता पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन उपक्रम राबविला. तसेच कारवाफासारख्या ग्रामीण भागात त्यांनी युवा महोत्सव आयोजित केला.सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी महिला अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे सत्कार, पत्रकार सन्मान असे विशेष कार्यक्रम केले. त्याचबरोबर या विभागांमधील चतुर्थ ते अगदी उच्च पदापर्यंतची नोकरी याविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.

या कालावधीत सांस्कृतिक, शारीरिकबरोबरच कौन बनेगा हजारोपती, यासारखी आगळीवेगळी बौद्धिक स्पर्धाही आयोजित केली होती. ज्ञानगंगा या नावाने फिरते वाचनालय सुरू करून त्यासाठी दीड हजार पुस्तके गोळा केली. जनजागरण, जनमैत्री मेळावे, जनविकास मेळावे आदींच्या माध्यमातून जनप्रबोधन करत युवा पिढीमध्ये चैतन्य निर्माण केले.त्यांनी सामाजिक बांधिलकीतून आदिवासींकरिता केलेले कार्य तसेच नक्षलवाद्यांच्या विरोधात उघडलेली मोहीम, अशा त्यांच्या या सर्वंकष कार्याची दखल घेऊन त्यांना हे मानाचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. थोड्याच दिवसांत त्यांना ते प्रदान करण्यात येणार आहे.तिघांचे आत्मसमर्पणनियुक्ती स्वीकारल्यानंतर गणेश इंगळे यांना काही कालावधीतच नक्षलवादी विरोधी दोन मोहिमांना सामोरे जावे लागले. या भागातील पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. तसेच ३ जणांनी आत्मसमर्पण केले. ठासनीच्या ४८ बंदुका जप्त केल्या.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी