शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मनी लाँड्रिंगची भीती दाखवून ६१ लाख रुपये लुटणाऱ्यास दिल्लीत अटक, रत्नागिरी सायबर पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:35 IST

चार दिवसांची पाेलिस काेठडी

रत्नागिरी : बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत एका ज्येष्ठ नागरिकाचे ६१ लाख १९ हजार ८० रुपये ऑनलाइन लुटणाऱ्या आरोपीला रत्नागिरीपोलिसांनीदिल्लीपोलिसांच्या मदतीने बेड्या ठाेकल्या . राजीव विश्वनाथ तिवारी (४७, रा. नाका, शिवनगर कॉलनी, पहाड गंज, फैजाबाद, उत्तर प्रदेश, सध्या रा. दिल्ली) असे त्याचे नाव आहे.राजीव तिवारी याने मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला सीमकार्ड बंद होणार आहे अशी भीती घालत पोलिसांकडे तक्रारीकरिता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा केला. यावेळी त्याच्यासाेबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादी यांचे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आलेले आहे आणि या खात्यामधून दोन कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घातली.

यावेळी फिर्यादी यांना त्या बँक खात्यामध्ये रक्कम भरण्यास भाग पाडत ६१ लाख १९ हजार ०८० रुपयाचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादी यांनी रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवून राजीव तिवारी याला अटक केली.ही कामगिरी सायबर पोलिस स्थानकाच्या प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, हवालदार रामचंद्र वडार, काॅन्स्टेबल रोहन कदम, रामदास पिसे, हवालदार संदीप नाईक, रमिज शेख यांनी बजावली.

चार दिवसांची पाेलिस काेठडीफसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बॅंकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे राजीव तिवारी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. दिल्ली येथे तपास पथक पाठवून कोणत्याही प्रकारचे मोबाइल लोकेशन प्राप्त नसताना खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. त्याला रत्नागिरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसdelhiदिल्ली