शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पर्ससीन परवानाधारक ३१२ नौकांवर गंडांतर, १८२ नौकांनाच परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:19 IST

राज्यातील पर्ससीन नौकांची ही संख्या पहिल्या टप्प्यात २६२ वर आणि अंतिमत: १८२ वर आणली जाणार आहे.

ठळक मुद्देपर्ससीन परवानाधारक ३१२ नौकांवर गंडांतर!१८२ नौकांनाच परवाने : मत्स्यसाठ्यांच्या जतनासाठी निर्णय

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग आदी सागरी जिल्ह्यांमध्ये परवाना असलेल्या ४९४ पर्ससीन मासेमारी नौका आहेत. राज्यातील मत्स्यसाठ्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्यातील पर्ससीन नौकांची ही संख्या पहिल्या टप्प्यात २६२ वर आणि अंतिमत: १८२ वर आणली जाणार आहे.

त्यामुळे राज्यातील परवानाधारक ३१२ नौकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. राज्यातील पर्ससीन नौकांच्या संख्येच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक परवानाधारक नौका असल्याने रत्नागिरी जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.राज्यातील एकूण ४९४ पर्ससीन नौकांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातच २७४ परवानाधारक पर्ससीन नौका आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे पहिल्या टप्प्यात ४९४ मधील २३२ नौकांचे परवाने गोठवले जातील. त्यानंतर उर्वरित २६२ मधील आणखी ८० परवाने रद्द होऊन राज्यातील पर्ससीन परवान्यांची एकूण संख्या १८२ वर आणली जाणार आहे. राज्य शासनाच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त अरूण विधले यांनी स्पष्ट केले आहे.अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना २४ जुलै २०१८ रोजी झालेल्या बैठकीत आयुक्तांच्या या निर्णयाची माहिती देण्यात आली. पर्ससीन मासेमारीबाबत राज्य सरकारने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्याचे मत्स्य आयुक्त अरुण विधले यांनी घेतला आहे.

राज्याच्या सागरी क्षेत्रात २५०० बेकायदा मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौका असल्याचा दावा कृती समितीने केला आहे. या सर्व नौकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. फेब्रुवारी २०१६मध्ये राज्य सरकारने मासेमारीबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणीही पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी केली होती.

त्यानंतर झालेल्या बैठकीत मत्स्य आयुक्तांनी शासन आदेशाची कडकपणे अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.अखिल महाराष्ट्र  मच्छीमार कृती समितीने केलेल्या मागणीनुसार एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्यांनी होणारी बेकायदेशीर मासेमारी आणि अन्य प्रश्नांबाबत ६ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ३ वाजता मत्स्य व्यवसाय राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होणार आहे.गोवा, कर्नाटक वगैरे परराज्यातील नौका मासेमारी परवाने नसताना विशेष आर्थिक क्षेत्रात तसेच राज्याच्या जलधी क्षेत्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारी करताना आढळल्यास त्यांच्यावर तटरक्षक दल, सागरी पोलिसांमार्फत कारवाई करण्यासाठी मत्स्य आयुक्त लेखी पत्र देणार आहेत. त्यामुळे हा संघर्ष चिघळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.बेकायदा २५०० पर्ससीन नौकांवर बंदरात किंवा किनाऱ्यांवरच कारवाईचे आदेश सहाय्यक मत्स्य आयुक्तांना देण्यात आले आहेत. परवानाधारक पर्ससीन नौकांकडून पर्ससीन जाळ्यांचा आस २५ मिलिमीटरपेक्षा कमी आढळेल, त्यांचे परवानेही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी