रत्नागिरी नवनिर्माण सेनेतर्फे कोरोना योद्धयांना मास्क, फेसशील्डचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:24+5:302021-06-01T04:23:24+5:30
रत्नागिरी : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रेल्वे स्टेशन कोविड चाचणी केंद्रावर नियुक्त सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य मित्र शिक्षक तसेच ...

रत्नागिरी नवनिर्माण सेनेतर्फे कोरोना योद्धयांना मास्क, फेसशील्डचे वाटप
रत्नागिरी : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रेल्वे स्टेशन कोविड चाचणी केंद्रावर नियुक्त सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य मित्र शिक्षक तसेच अन्य फ्रंटलाईन वर्कर, स्वयंसेवक यांना मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड आणि इतर उपयोगी वस्तू तसेच प्रत्येकी ३ डझन रत्नागिरी हापूस आंब्यांचे वाटप करण्यात आले.
राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा उपक्रम राबवला. मनविसे रत्नागिरीचे जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे यांच्यातर्फे रत्नागिरी मनसे उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ यांच्या प्रयत्नाने मनविसे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, शहराध्यक्ष महेश शेळके, तालुकाध्यक्ष चैतन्य शेंडे यांच्या हस्ते रेल्वे स्टेशन कोविड चाचणी केंद्रावर नियुक्त सर्व आरोग्य अधिकारी, शिक्षक आणि फ्रंटलाईन वर्कर, स्वयंसेवक यांना मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड आणि इतर उपयोगी वस्तू तसेच प्रत्येकी ३ डझन रत्नागिरी हापूस आंब्यांचे वाटप करण्यात आले.
रेल्वे स्टेशन येथे कोरोना चाचणीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्वच कोरोना योद्ध्यांचे यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी आरोग्यसेवक नीलेश पिलणकर, बापू दराडे, विनीत सातोपे तसेच सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
फोटो मजकूर
रत्नागिरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रेल्वे स्टेशन कोविड चाचणी केंद्रावर कार्यरत असलेल्या कोरोना योद्ध्यांना मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड आणि इतर उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.