शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबावची मोजणी पुन्हा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:06 IST

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबाव बाजारपेठेतील जागेची ११ ते १३ डिसेंबर रोजी होणारी मोजणी लांबणीवर गेली आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबईत जाऊन भेटले. आमदार उदय सामंत यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी हिवाळी अधिवेशन काळात शिष्टमंडळाला नागपूर येथे बोलावले आहे.

ठळक मुद्दे नागपूर अधिवेशन काळात शिष्टमंडळाशी चर्चेनंतर निर्णय होणार मिऱ्या -साळवी स्टॉप ते हातखंबा व पुढे कोल्हापूर-नागपूर असा महामार्ग होणार या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे.नोव्हेंबर महिन्यात दोनवेळा कुवारबांव येथे मोजणीनागपूरमध्ये चर्चेतून निर्णय?

रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबाव बाजारपेठेतील जागेची ११ ते १३ डिसेंबर रोजी होणारी मोजणी लांबणीवर गेली आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबईत जाऊन भेटले. आमदार उदय सामंत यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी हिवाळी अधिवेशन काळात शिष्टमंडळाला नागपूर येथे बोलावले आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष नीलेश लाड यांनी ही माहिती लोकमतला दिली.

चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जागेची मोजणी उपविभागीय कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र, कुवारबाव बाजारपेठेत ४५ मीटर जागा घेण्यासाठी मोजणीचा प्रयत्न झाला. परंतु, त्यामुळे संपूर्ण कुवारबाव बाजारपेठच उद्ध्वस्त होणार आहे.

याठिकाणी चौपदरीकरणाला विरोध नाही. मात्र, ४५ मीटरऐवजी ३० मीटर जागा चौपदरीकरणासाठी घ्यावी, अशी भूमिका कुवारबाव व्यापारी संघ व स्थानिकांनी घेतली आहे. ३० मीटर रुंदीकरणातही काही दुकाने, घरे जात आहेत. तरीही जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. मात्र, ४५ मीटर जागा घेतल्यास कुवारबाव बाजारपेठेचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. त्यामुळेच ४५ मीटर रुंदीची जागा घेण्यास विरोध आहे.नोव्हेंबर महिन्यात दोनवेळा कुवारबाव बाजारपेठेत चौपदरीकरणासाठीच्या ४५ मीटर जागा मोजणीचा प्रयत्न झाला. परंतु, निदर्शने, रास्ता रोको या माध्यमातून तीव्र विरोध करीत व्यापारी संघ व कुवारबाववासियांनी ही मोजणी रोखली होती. याप्रकरणी बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व्यापारी संघाने उपविभागीय अधिकाºयांना सांगितल्यानंतर १० डिसेंबरपर्यंत येथील मोजणीला स्थगिती देण्यात आली होती.नागपूरमध्ये चर्चेतून निर्णय?३० नोव्हेंबर रोजी बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे रत्नागिरी दौऱ्यावर येणार होते. मात्र, हा दौरा न झाल्याने कुवारबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष नीलेश लाड तसेच पदाधिकारी राजेश तोडणकर, प्रभाकर खानविलकर यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी नागपूर अधिवेशना ठिकाणी याबाबत चर्चा करूया, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. त्यानुसार ११ डिसेंबरपासून होणारी मोजणीही महामार्ग विभागाने स्थगित केल्याची माहिती पाटील यांनी व्यापारी संघाला दिल्याचे लाड म्हणाले. 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील