कोल्हापूर ते वैभववाडी राष्ट्रीय महामार्गाला अंतिम मंजुरी, सांगली ते पेठ नाका मार्ग होणार चौपदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 09:11 PM2017-12-04T21:11:22+5:302017-12-04T21:12:29+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्'ांतून जाणाºया नव्या दोन राष्टÑीय महामार्गांना राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली.

Final approval to Kolhapur from Vaibhavavadi National Highway, Sangli to Peth Naka Road will be done on Chowpadari | कोल्हापूर ते वैभववाडी राष्ट्रीय महामार्गाला अंतिम मंजुरी, सांगली ते पेठ नाका मार्ग होणार चौपदरी

कोल्हापूर ते वैभववाडी राष्ट्रीय महामार्गाला अंतिम मंजुरी, सांगली ते पेठ नाका मार्ग होणार चौपदरी

googlenewsNext
ठळक मुद्देकोकणशी दळणवळण करण्यास सोयीस्कर होणारतावडे हॉटेलनजीक पुणे ते बंगलोर या राष्टÑीय महामार्गाला जोडणार

तानाजी पोवार

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्'ांतून जाणाºया नव्या दोन राष्टÑीय महामार्गांना राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली. कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडीमार्गे तळेरे (जि. सिंधुदुर्ग) तसेच सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) असे हे दोन नवे राष्टÑीय महामार्ग होत आहेत. हे दोन्हीही मार्ग संपूर्ण सिमेंट काँक्रिटचे असतील. यामुळे मुंबई ते गोवा आणि रत्नागिरी ते नागपूर हे दोन्हीही राष्टÑीय महामार्ग पुणे ते बंगलोर (एनएच ४) या राष्टÑीय महामार्गाला जोडले जाणार आहेत. या दोन्हीही नव्या रस्त्यांमुळे दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर राज्याला फायदा होणार आहे.

कोकणमधील व्यापाºयाला चालना मिळावी या उद्देशाने राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाच्यावतीने कोकण पुणे ते बंगलोर राष्टÑीय महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव विचारधीन होता. त्याबाबतचा विकास आराखडा तयार करून तो मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यावेळी तत्त्वत: मंजुरी घेण्यात आली होती. त्यावर सोमवारी राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने अंतिम मंजुरीची मोहोर उमटवली.

सध्या कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडी ते तळेरे (जि. सिंधुदुर्ग) हा रस्ता राज्य महामार्ग असून त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. कोकणला जोडणारा हा प्रमुख महामार्ग गणला जातो, पण या रस्त्याची रुंदी खूपच कमी असल्याने येथे अनेक अपघातांना निमंत्रण दिले जाते. हा महामार्ग मुंबई ते गोवा (एनएच ६६) राष्टÑीय महामार्गाला जोडला जातो, पण याच रस्त्याला राष्टÑीय महामार्ग म्हणून अंतिम मान्यता देण्यात आली असून तो चौपदरीकरण करण्यात येणार आहे. तळेरे येथून सुरू होणारा हा रस्ता कोल्हापुरात तावडे हॉटेलनजीक पुणे ते बंगलोर या राष्टÑीय महामार्गाला जोडणार आहे. या नव्या रस्त्याचा नंबर ‘१६६ जी’ असा असेल.

याशिवाय दुसरा नवा मार्ग हा सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) असा असून त्याचा नंबर ‘१६६ एच’ असा असेल. हा मार्गही चौपदरीकरण करण्यात येणार असून तो रत्नागिरी ते नागपूर या राष्टÑीय महामार्गाला मिरज येथे जोडला जाणार आहे. या दोन्हीही नव्या राष्टÑीय महामार्गामुळे कोकणशी दळणवळण करण्यास सोयीस्कर होणार आहे.

या नव्या मार्गांना अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे आता त्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.दोन्हीही राष्टÑीय महामार्ग सिमेंट काँक्रिटचेराष्टÑीय रस्ते विकास महामंडळामार्फत अंतिम मंजुरी मिळालेले हे नवे दोन्हीही राष्टÑीय महामार्ग चौपदरीकरण होणार असून ते सिमेंट काँक्रिटचे असतील. हे रस्ते निर्माण करणाºया ठेकेदाराला त्याच्या देखभालीची जबाबदारी ठरावीक वर्षासाठी देण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहरावर वाहतुकीचा भार वाढणार
हे दोन्हीही नवे मार्ग रत्नागिरी ते नागपूर तसेच गोवा ते मुंबई या मार्गांना जोडले जाणार असल्याने त्यावरील वाहतुकीचा भार हा कोल्हापूर शहरावर आणि पुणे ते बंगलोर या मार्गावर पडणार आहे.
 

फुलेवाडीपर्यंत चौपदरीकरण
तळेरे, वैभववाडी, गगनबावडा ते कोल्हापूर हा रस्ता पूर्ण सिमेंट काँक्रिटचा असून तो फुलेवाडीपर्यंत चौपदरी, तर तेथून तो तावडे हॉटेलपर्यंत दुपदरी असेल.
 

गेले काही वर्षे चर्चेत असणारे तळेरे ते गगनबावडा मार्गे कोल्हापूर आणि सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) या दोन्हीही राज्य महामार्गांना राष्टÑीय महामार्ग म्हणून अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्याच्या चौपदरीकरण कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
-व्ही. आर. कांडगावे, मुख्य कार्यकारी अभियंता, राष्टÑीय रस्ते महामार्ग, कोल्हापूर
 

 

Web Title: Final approval to Kolhapur from Vaibhavavadi National Highway, Sangli to Peth Naka Road will be done on Chowpadari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.