शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

रत्नागिरी महावितरण कंपनीकडे २३७२ शेतकऱ्यांची १० लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:17 IST

थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार आहे.

ठळक मुद्देथकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासामार्च २०१७अखेर असलेली मूळ थकबाकी पाच ते दहा सुलभ हप्त्यांमध्ये फेडता येणार

रत्नागिरी : थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार असून, मार्च २०१७अखेर असलेली मूळ थकबाकी पाच ते दहा सुलभ हप्त्यांमध्ये फेडता येणार आहे.वीजबिल वसुलीत कायम अग्रेसर राहणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात २३७२ शेतकरी हे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे मार्च२०१७ अखेरीस १० लाखांच्या वीजबिलाची थकबाकी असून, एप्रिलनंतर दिलेल्या चालू त्रैमासिक बिलापोटी ८ लाख ९४ हजार ९४ रुपये येणे आहे. चालू बिले न भरल्यास १५ नोव्हेंबरपासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.जिल्ह्यातील या २३७२ थकबाकीदार कृषी पंपधारकांकडे मार्च २०१७ अखेरीस मूळ थकबाकीचे ९ लाख ३९ हजार ८७ रुपये, व्याजाचे ४८ हजार १७८ रुपये तर दंडापोटी १० हजार ६६ रुपये अशी एकूण ९ लाख ९७ हजार ३३१ रुपये थकबाकी आहे.

एप्रिलनंतरच्या चालू बिलापोटी ८ लाख ९४ हजार रुपये भरावे लागणार आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत चालू बिले भरणाऱ्यांनाच कृषी संजीवनी योजेनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या व दंड-व्याज बाजूला ठेवून मार्च २०१७ अखेर ३० हजारापेक्षा कमी मूळ थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना थकबाकी फेडण्यासाठी पाच समान हप्ते दिले जाणार आहेत.

हा प्रत्येक हप्ता २० टक्के रकमेचा असून, पहिला हप्ता डिसेंबर २०१७, दुसरा मार्च २०१८, तिसरा जून २०१८, चौथा सप्टेंबर २०१८ ला तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यंत भरावा लागणार आहे.या प्रत्येक हप्त्यांसोबत पुढील येणारे बिल भरणेही क्रमप्राप्त आहे. ज्यांच्याकडे तीस हजारांहून अधिक मूळ थकबाकी आहे, त्यांना मूळ थकबाकीचे प्रत्येकी १० टक्के रकमेचे दहा हप्ते मिळणार आहेत.

संपूर्ण हप्ते व चालूबिलाचा भरणा डिसेंबर २०१८पूर्वी व दिलेल्या मुदतीत केल्यास थकबाकीवर आकारलेले दंड व व्याज माफ होणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.सहकार्य करावेरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपूर्वी कृषीपंपाची चालू बिले भरुन मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना -२०१७ मध्ये सहभागी व्हावे व थकबाकीमुक्त होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कोकण विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी