शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, मंडणगडात राजकीय संग्राम

By admin | Updated: October 31, 2015 22:31 IST

आज मतदान : पालिकांमध्ये पक्षांचे डावपेच पणाला, छोट्या लढाईतही उतरले बडे नेते

रत्नागिरी : नगर परिषदेच्या चार जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. दोन प्रभागातील चार जागांसाठी एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या प्रभागातील एकूण १६,४९८ मतदार उद्या मतदान करणार आहेत. नगर परिषदेच्या प्रभाग क्र. २ मधील ब आणि ड तसेच प्रभाग क्रमांक ४ अ आणि ४ ड या दोन प्रभागातील प्रत्येकी एक जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी एकूण १३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. प्रभाग क्र. २ ब आणि २ ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत आहे. प्रत्येकी एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागातील एकूण ८६११ मतदार उद्या ७ केंद्रावर मतदान करणार आहेत. प्रभाग क्र. ४ अ आणि ४ ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत आहे. ४ अ मधील एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत तर ४ ड मधील एका जागेसाठी ४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (प्रतिनिधी) मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक रविवारी होत असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे मतदान डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व जिल्हा परिषदेच्या तालुका स्कूल या ठिकाणी होणार आहे. यात प्रभाग १साठी जिल्हा परिषद मराठी शाळा, गांधी चौक खोली क्रमांक १ हे ठिकाण निश्चित झाले आहे. प्रभाग २ साठी जिल्हा परिषद मराठी शाळा खोली क्रमांक २ हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ३ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड इमारत क्रमांक २ मधील खोली क्रमांक ७ हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ४साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड इमारत क्रमांक ३मध्ये मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक ५ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड इमारत क्रमांक ३ मधील खोली क्रमांक १०, प्रभाग ६ साठी इमारत क्रमांक ४मधील खोली क्रमांक १४, प्रभाग ७ साठी इमारत क्रमांक ५मधील खोली क्रमांक १७, प्रभाग ८ साठी इमारत क्रमांक ५ मधील खोली क्रमांक १५, प्रभाग ९साठी इमारत क्रमांक ५ मधील खोली क्रमांक १५, प्रभाग ९ साठी इमारत क्रमांक ४ मधील खोली क्रमांक १२ हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १०साठी इमारत क्रमांक ६मधील खोली क्रमांक १९, प्रभाग ११ साठी जिल्हा परिषद मराठी शाळा इमारत क्रंमाक २ खोली क्रमांक ५, प्रभाग १२साठी मराठी शाळा इमारत क्र.१ मधील खोली क्रमांक ३, क्रमांक १३साठी याच इमारतीत खोली क्रमांक १, प्रभाग क्रमांक १४साठी आंबेडकर हायस्कूल, इमारत क्रमांक १ मधील खोली क्रमांक १, १५साठी इमारत १मधील खोली क्रमांक ३, प्रभाग १६साठी इमारत क्रमांक २मधील खोली क्रमांक ५, प्रभाग क्रमांक १७ साठी इमारत क्रमांक ६मधील खोली क्रमांक २१ हे ठिकाण निश्चित केले आहे. तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ३२ कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. एस. फड, निवडणूक निरीक्षक म्हणून जी. जी. निगुडकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कविता जाधव काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)