रत्नागिरी, मंडणगडात राजकीय संग्राम
By Admin | Updated: October 31, 2015 22:31 IST2015-10-31T22:31:14+5:302015-10-31T22:31:14+5:30
आज मतदान : पालिकांमध्ये पक्षांचे डावपेच पणाला, छोट्या लढाईतही उतरले बडे नेते

रत्नागिरी, मंडणगडात राजकीय संग्राम
रत्नागिरी : नगर परिषदेच्या चार जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. दोन प्रभागातील चार जागांसाठी एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या प्रभागातील एकूण १६,४९८ मतदार उद्या मतदान करणार आहेत.
नगर परिषदेच्या प्रभाग क्र. २ मधील ब आणि ड तसेच प्रभाग क्रमांक ४ अ आणि ४ ड या दोन प्रभागातील प्रत्येकी एक जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी एकूण १३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. प्रभाग क्र. २ ब आणि २ ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत आहे. प्रत्येकी एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागातील एकूण ८६११ मतदार उद्या ७ केंद्रावर मतदान करणार आहेत. प्रभाग क्र. ४ अ आणि ४ ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत आहे. ४ अ मधील एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत तर ४ ड मधील एका जागेसाठी ४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (प्रतिनिधी)
मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक रविवारी होत असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे मतदान डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व जिल्हा परिषदेच्या तालुका स्कूल या ठिकाणी होणार आहे.
यात प्रभाग १साठी जिल्हा परिषद मराठी शाळा, गांधी चौक खोली क्रमांक १ हे ठिकाण निश्चित झाले आहे. प्रभाग २ साठी जिल्हा परिषद मराठी शाळा खोली क्रमांक २ हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ३ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड इमारत क्रमांक २ मधील खोली क्रमांक ७ हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ४साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड इमारत क्रमांक ३मध्ये मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक ५ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड इमारत क्रमांक ३ मधील खोली क्रमांक १०, प्रभाग ६ साठी इमारत क्रमांक ४मधील खोली क्रमांक १४, प्रभाग ७ साठी इमारत क्रमांक ५मधील खोली क्रमांक १७, प्रभाग ८ साठी इमारत क्रमांक ५ मधील खोली क्रमांक १५, प्रभाग ९साठी इमारत क्रमांक ५ मधील खोली क्रमांक १५, प्रभाग ९ साठी इमारत क्रमांक ४ मधील खोली क्रमांक १२ हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक १०साठी इमारत क्रमांक ६मधील खोली क्रमांक १९, प्रभाग ११ साठी जिल्हा परिषद मराठी शाळा इमारत क्रंमाक २ खोली क्रमांक ५, प्रभाग १२साठी मराठी शाळा इमारत क्र.१ मधील खोली क्रमांक ३, क्रमांक १३साठी याच इमारतीत खोली क्रमांक १, प्रभाग क्रमांक १४साठी आंबेडकर हायस्कूल, इमारत क्रमांक १ मधील खोली क्रमांक १, १५साठी इमारत १मधील खोली क्रमांक ३, प्रभाग १६साठी इमारत क्रमांक २मधील खोली क्रमांक ५, प्रभाग क्रमांक १७ साठी इमारत क्रमांक ६मधील खोली क्रमांक २१ हे ठिकाण निश्चित केले आहे. तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ३२ कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. एस. फड, निवडणूक निरीक्षक म्हणून जी. जी. निगुडकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कविता जाधव काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)