शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:56 IST

खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे.

ठळक मुद्देकमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोयचोरद पुलामुळे ४० गावांना दिलासा

खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. या नदीवर असलेला कमी उंचीचा जुना पूल पावसाळ्यात कायम पाण्याखाली जाऊन आंबवली परिसरातील ४० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटत असे.खेड तालुक्यातील आंबवली परिसरात सुकिवली, कुडोशी, मोहाने, सणघर, चाटव, वडगाव अशी सुमारे ४० गावे आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदी पार करून जावे लागते.

१९५७ साली या नदीवर पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, या पुलाची उंची अतिशय कमी म्हणजे केवळ २.५ मीटर इतकीच असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की, कमी उंचीचा हा पूल पाण्याखाली जाऊन आंबवली परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटत असे.

खेडमध्ये शाळा, महाविद्यालयात आलेले विद्यार्थी किंवा दैनंदिंन कामासाठी शहरामध्ये आलेले ग्रामस्थ कधी पुलाच्या अलिकडे, तर कधी पुलाच्या पलिकडे अडकून बसत असत.पावसाळ्याच्या चार महिन्यांत चोरद नदीला कधी पूर येईल आणि पूल पाण्याखाली जाऊन या गावांचा संपर्क तुटेल याचा नेम नसल्याने पावसाळ्यात या परिसरातील ग्रामस्थ नेहमीच भीतीच्या छायेखाली वावरत असत.

ग्रामस्थांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता चोरद नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी या परिसरातील लोकांनी लावून धरली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची उंची वाढविण्याबाबतचा प्रस्तावदेखील पाठविण्यात आला होता. मात्र, हा प्रस्तावही शासनाच्या लाल फितीत अडकून पडल्याने पुलाचे काम मार्गी लागत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांची समस्याही निकाली निघत नव्हती. दरवर्षी पुराचा धोका होता. आता हा प्रश्न संपला आहे.चोरद नदीवर नव्याने पूल बांधावा अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत होती. पावसाळ्या या गावांचा संपर्कच तुटत असे. त्यामुळे हा पूल महत्वाचा होता. मात्र, अनेक वर्षे शासन दरबारी धूळ खात पडलेल्या प्रस्तावाला अखेर २०१२मध्ये हिरवा कंदील मिळाला आणि चोरद नदीवरील पुलाची उंची वाढवण्याच्या कामाला चालना मिळाली.

आंबवली परिसरातील अनेक गावांना जोडणारा चोरद नदीवरील पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाल्याने या मार्गावरील पावसाळ्यात ग्रामस्थांची होणारी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरीRainपाऊस