सुरकंडी लघूप्रकल्प तुडुंब; पूल पाण्याखाली जाण्याची भीती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:47 PM2018-07-18T14:47:17+5:302018-07-18T14:50:06+5:30

वाशिम - वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला असून, प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर  पाणी आले आहे.

Surkandi dam full, bridge under water | सुरकंडी लघूप्रकल्प तुडुंब; पूल पाण्याखाली जाण्याची भीती  

सुरकंडी लघूप्रकल्प तुडुंब; पूल पाण्याखाली जाण्याची भीती  

Next
ठळक मुद्दे या प्रकल्पात गेल्या तीन चार वर्षांपासून ७० पेक्षा अधिक टक्के जलसाठा होत आहे. सुरकंडी गावालगत असलेल्या कमी उंचीच्या पुलाच्या समपातळीत सद्यस्थितीत धरणातील जलसाठा आला.येत्या काही दिवसात हा पूल पाण्याखाली जाण्याची भीती वर्तविली जात आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला असून, प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर  पाणी आले आहे. येत्या काही दिवसात पावसाची संततधार अशीच राहिली तर हा पूल पूर्णपणे पाण्यात जाण्याची भीती गावकºयांमधून वर्तविली जात आहे. यामुळे या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याच्या शक्यतेने गावकºयांची झोप उडाली आहे.
वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लांडकदरा शेतशिवारात सन २००७-२००८ मध्ये लघू प्रकल्पाचे काम सुरु झाले होते. तब्बल दहा वषार्नंतरही धरणाचे काम पूर्णत्वाकड आले नाही. धरणाच्या सांडव्याच्या भींतीचे काम सुरू असतांना सद्यस्थितीतीत पावसामूळे काम थांबविले आहे. चारशे हेक्टरच्या आसपास शेती सिंचनाखाली येणार असलेल्या या प्रकल्पात गेल्या तीन चार वर्षांपासून ७० पेक्षा अधिक टक्के जलसाठा होत आहे. यावर्षींच्या दमदार पावसामूळे या धरणातील पाणीसाठा जवळपास ८० टक्के झाला आहे. अजून एखादा पाऊस झाल्यास जलसाठयात वाढ होणार आहे. या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेतशिवारातून मागील बाजूने वाशिमकडून येणारा जि. प. च्या अंतर्गत असलेला सुरकंडी खु., सुरकंडी बु, फाळेगाव थेट, शिरपूटी, कृष्णा, वारला, अनसिंग हा रस्ता जातो. या रस्त्यावर सुरकंडी गावालगत असलेल्या कमी उंचीच्या पुलाच्या समपातळीत सद्यस्थितीत धरणातील जलसाठा आला असून तो वाढत आहे. येत्या काही दिवसात हा पूल पाण्याखाली जाण्याची भीती वर्तविली जात आहे. या रस्त्यावरुन जाणाºया गावकºयांचा वाशिमशी संपर्क तुटण्याची तसेच सुरकंडी येथील शेतकºयांना शेतात जाणारा  रस्ताही  बंंद होणार असल्याच्या शक्यतेने गावकरी भयभीत झाले आहेत. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता या पुलाची उंची त्वरीत वाढविण्यात यावी, अशी मागणी पिरूभाई बेनिवाले यांच्यासह गावकºयांनी बुधवारी केली.

Web Title: Surkandi dam full, bridge under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.