शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

रत्नागिरीमध्ये स्थानिकांनी अशी वाचवली खलांशी भरकटलेली बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 4:55 PM

सलग तीन दिवस कोसळणारा पाऊस आणि वादळसदृश वाऱ्यामुळे खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारी पाच नौका बुडाल्या. मात्र याचवेळी भरकटलेल्या तीन खलाशांची एक नौका ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाचवण्यात आली आहे. उसळत्या लाटांवर डोलणारी ही नौका कधीही बुडण्याची भीती होती. पण किनाऱ्यावर जमलेल्या ग्रामस्थांनी ती वाचवली. त्यावर तीन खलाशी होते.

रत्नागिरी, दि. 20 - सलग तीन दिवस कोसळणारा पाऊस आणि वादळसदृश वाऱ्यामुळे खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारी पाच नौका बुडाल्या. मात्र याचवेळी भरकटलेल्या तीन खलाशांची एक नौका ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाचवण्यात आली आहे. उसळत्या लाटांवर डोलणारी ही नौका कधीही बुडण्याची भीती होती. पण किनाऱ्यावर जमलेल्या ग्रामस्थांनी ती वाचवली. त्यावर तीन खलाशी होते.

दरम्यान, रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात झालेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा हर्णे येथील मच्छीमारांना बसला  आहे. दापोली किनाऱ्याच्या विविध बंदरात नांगरून ठेवलेल्या पाच मच्छिमारी नौका या वाऱ्याच्या तडाख्याने उलटल्या. यामधील 21 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलं असून एका खलाशाचा मृतदेह हाती लागला आहे. त्यातील एक बोट समुद्रात हेलकावे खात असताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. या बोटीत काही मच्छिमार होते. पण बोट जोरदार हेलकावे खात असल्यानं या बोटीवरील सर्वच मच्छिमारांनी थेट समुद्रात उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

यातील बहुतांश खलाशांनी पोहत बाहेर येत आपले प्राण वाचवले. हर्णे येथील रामचंद्र जोमा पाटील यांची भक्ती, हरीश्चंद्र पाटील यांची गगनगीरी तर भारत पेडणेकर व संतोष पावसे यांच्या बोटी लाटांच्या तडाख्याने उलटल्या. यामुळे बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.केवळ दैव बलवत्तर म्हणून 20 हून अधिक जणांचे प्राण वाचले आहेत. रामचंद्र पाटील यांच्या बोटीवरील सात खलाशांपैकी पाच खलाशांना वाचवण्यात यश आले असून एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. दरम्यान एनडीआरएफची एक टीम पुण्याहून दापोलीकडे रवाना करण्यात आली आहे.