शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांचा भूमिगत वाहिन्यांना अडसर, काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:25 IST

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ७० किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे.

ठळक मुद्दे-एकात्मिक ग्रामीण योजना : ७० किलोमीटरपर्यंतची वाहिनी-महावितरण कंपनीकडून मंजूर निधीपेक्षा अधिकतम रकमेची मागणी-सौरऊर्जा पॅनेलची कामे पूर्ण केली जाणार

रत्नागिरी : एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात ७० किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. वाहिनी टाकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खोदकामाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे.

खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागणी महावितरणकडून करण्यात येऊनही मंजूर निधीपेक्षा अधिकतम रकमेची मागणी केली जात असल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे.महावितरण कंपनीतर्फे एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात उच्चदाब व लघुदाब भूमिगत वाहिन्या टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लघुदाबाची राजापुरात ६ किलो मीटर, खेडमध्ये २२ किलोमीटर, उच्चदाब वाहिनीअंतर्गत दापोलीत १५ किलोमीटर व खेडमध्ये २७ किलोमीटरचे काम मंजूर आहे.

राजापूर वाहिनीसाठी ५४ लाख ७९ हजार, खेड वाहिनीकरिता १ कोटी ५७ लाख ५८ हजार, दापोली व खेडमधील उच्चदाब वाहिनीसाठी ५ कोटी ८६ लाख २१ हजार मिळून एकूण ७ कोटी ९८ लाख ५८ हजार रूपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, भूमिगत वाहिन्यांच्या खोदकामाला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे कामे सुरू होण्यापूर्वीच थांबली आहेत. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ३९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली शहरांमधील विद्युत वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासह शहरांची वाढती लोकसंख्या गृहीत धरून ट्रान्स्फॉर्मर क्षमता वाढविणे, नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवणे, गंजलेले कंडक्टर, तारा, विद्युतखांब बदलणे, वीज वितरण बॉक्स (डीपी) बसवणे, नवीन वीजवाहिनी व भूमिगत वाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

या कामांसाठी रत्नागिरी शहराला ६ कोटी ३९ लाख, राजापूर १ करिता ३ कोटी २२ लाख, चिपळूण शहरासाठी ७ कोटी ९ लाख, खेडकरिता १० लाख ५६ हजार, दापोली १ साठी ७ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर असून, या निधीतून ही विविध कामे सुरू आहेत.

याशिवाय सौरऊर्जा पॅनेलची कामे पूर्ण केली जाणार असून, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, दापोलीमध्ये प्रत्येकी २ मिळून एकूण १० किलोवॅटची कामे पूर्ण केली जाणार आहेत. 

महावितरणतर्फे ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. वादळी वारे, पाऊस यामुळे काही ठिकाणी सुरक्षिततेच्या पार्श्वभूमिवर भूमिगत वाहिन्यांसाठीचा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे वीज पुरवठ्यामध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी ठराविक भागातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहे. महावितरणदेखील लोकसेवा बजावत असल्यामुळे खोदकामाचा दर कमी असावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी खोदकामासाठी परवानगी दिली, तर लवकरात लवकर काम सुरू होईल. पावसाळा तोंडावर असल्याने लवकर परवानगी मिळणे गरजेचे आहे. ज्या शहरांसाठी भूमिगत वाहिन्यांचे काम केले जाणार आहे, त्यांनीच खोदकामाची परवानगी रखडवल्यामुळे कामे थांबली आहेत.- पी. जी. पेठकर,प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासRatnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरण