शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

रत्नागिरी : जिल्हा परिषद व शासकीय कर्मचाऱ्यांचा २२ रोजी मंत्रालयावर महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:43 IST

सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रालयावर धडकणार आहेत.

ठळक मुद्दे सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी धडकणार२२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रालयावर महामोर्चा

रत्नागिरी : सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रालयावर धडकणार आहेत.शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना लागू करणे, केंद्रप्रमाणे महागाई भत्ता देणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, ३० टक्के नोकर कपातीचा निर्णय रद्द करून रिक्त पदे त्वरित भरणे, अनुकंपा भरती विनाअट लागू करणे, वेतनत्रुटींचे विनाअट निवारण करणे, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करणे, निवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला पूर्वीप्रमाणे शासन सेवेत नियुक्त करणे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करणे, या प्रमुख मागण्या आहेत.या मागण्यांसाठी गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंत्रालयावर महामोर्चा काढणार आहेत. यावेळी सरकारच्या वेळकाढू धोरणाचा जोरदार निषेध करणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद महासंघाचे अध्यक्ष वामन कदम यांनी दिली.काही कर्मचारी संघटना मुख्यमंत्र्यांच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पसरवून आपणच सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचा भास निर्माण करत आहेत. १७ लाख कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे कर्मचारी नेते र. ग. कर्णिक व अशोक थूल यांच्या संघर्षमय चळवळीमुळे कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक लाभ प्राप्त झाले आहे.अद्याप कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी मुख्यमंत्र्यांनी कोणतीच चर्चा केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विचलित होण्याचे कारण नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने, पूर्ण ताकदीनिशी या महामोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयGovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी