एक लाख कामगार मंत्रालयावर धडकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:06 AM2018-01-22T04:06:48+5:302018-01-22T04:13:12+5:30

कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी, एक लाख कामगार एप्रिल महिन्यात मंत्रालयावर धडक देणार आहेत.

 One lakh workers will be attacked! | एक लाख कामगार मंत्रालयावर धडकणार!

एक लाख कामगार मंत्रालयावर धडकणार!

Next

मुंबई : कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी, एक लाख कामगार एप्रिल महिन्यात मंत्रालयावर धडक देणार आहेत. या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी सिटू संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी, २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये होणार आहे. या बैठकीला सिटूच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. के. हेमलता मार्गदर्शन करणार असून, राज्यातील ११० राज्य कार्यकारिणी सदस्य या वेळी उपस्थित राहतील.
सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होईल. कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार कायद्यासह किमान वेतन म्हणून १८ हजार रुपये, कंत्राटी पद्धत रद्द करून कामगारांना कायम करणे, समान कामाला समान वेतन, योजना कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा, अशा मुद्द्यांवर कार्यकारिणीत चर्चा होईल.

Web Title:  One lakh workers will be attacked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.