रत्नागिरी :  फ्री वे शिपिंग कॉरिडॉरच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:34 PM2018-10-30T17:34:29+5:302018-10-30T17:35:46+5:30

गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यापासून १५ ते ३५ नॉटिकल मैलाच्या सागरी क्षेत्रात फ्री वे शिपिंग कॉरिडॉर उभारण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मंगळवारी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमार संघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.

Ratnagiri: Fishermen's Front Against Free Way Shipping Corridor | रत्नागिरी :  फ्री वे शिपिंग कॉरिडॉरच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा

रत्नागिरी :  फ्री वे शिपिंग कॉरिडॉरच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा

Next
ठळक मुद्दे फ्री वे शिपिंग कॉरिडॉरच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा मच्छीमार संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

रत्नागिरी : गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यापासून १५ ते ३५ नॉटिकल मैलाच्या सागरी क्षेत्रात फ्री वे शिपिंग कॉरिडॉर उभारण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मंगळवारी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमार संघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.

हे कॉरिडॉर झाल्यास पश्चिम किनाऱ्यांवरील १०० नॉटीकल मैलाच्या क्षेत्रात होणारी मासेमारी धोक्यात येईल व मासेमारी व्यवसायच संपुष्टात येण्याची भीती आहे. यामुळे देशभरातील सुमारे १० कोटी मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या व्यापारी जलमार्गाच्या विरोधात मच्छीमारांनी आज देशव्यापी आंदोलन केले. रत्नागिरी जिल्हा मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमार संघानेही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

शहरातील शनिवार बाजारपेठेतून हा मोर्चा सुरू झाला. हातात फलक घेतलेले मच्छीमार यात सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र कृती समितीचे उपाध्यक्ष अमजद बोरकर, रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघाचे अधय्क्ष बाबामिया मुकादम, नदीम सोलकर, अनिरूद्ध साळवी, मच्छीमार नेते आप्पा वांदरकर, दिलावर गोदड, प्रवीण दळवी, तबरेज सोलकर, राकेश मयेकर तसेच सुमारे ५० मच्छिमार उपस्थित होेते. यावेळी जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन सादर करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले.

Web Title: Ratnagiri: Fishermen's Front Against Free Way Shipping Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.