शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

रत्नागिरी : आवाशीत पाण्याची भीषणता, आठवडाभर थेंबही नाही,  महिलावर्ग एमआयडीसीवर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 18:11 IST

एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे. परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी मृत पावल्या गेल्या. साहजिकच आवाशी गाव हे पूर्णपणे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तीन महिन्यांपासून या गावात पाणी भीषणटंचाई उद्भवली आहे.

ठळक मुद्दे- कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे येथील महिलांना पायपीट करावी लागते- वाशिष्ठीत पाणीसाठा झालाच तर र्खंिडत वीजपुरवठ्यामुळे पंपहाऊसमध्ये उपसा होत नाही. पाण्याची जुनी असणारी लाईन अनेक ठिकाणी फुटत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम.

आवाशी : एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे.पस्तीस वर्षांपूर्वी येथे औद्योगिक वसाहत आली अन् हळूहळू परिसरासह गावाचा कायापालट होऊ लागला. येथील तरुणांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे सर्व सुखसोयी आपसूक प्राप्त होऊ लागल्या. गावच्या विकासाबाबत बोलायचे झाल्यास रस्ते, दिवाबत्तीसह वाडीवाडीवर प्रत्येकाच्या घरापर्यंत काँक्रिटच्या पाखाड्या पोहोचल्या. मात्र, हा विकासच आज त्यांना पाण्यापासून म्हणजेच मूलभूत गरजेपासून कोसो दूर घेऊन गेला. संपूर्ण रासायनिक वसाहत असणाऱ्या या गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत पूर्णत: निकामी झाले. पस्तीस वर्षांपूर्वी प्रत्येक वाडीत दोन ते तीन नैसर्गिक विहिरी होत्या.त्यामुळे पाण्याची समस्या कधीच उद्भवली नव्हती. मात्र, परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी मृत पावल्या गेल्या. साहजिकच आवाशी गाव हे पूर्णपणे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तीन महिन्यांपासून या गावात पाणी भीषणटंचाई उद्भवली आहे. कधी - कधी आठवडाभर खंडित, तर अनेक वेळा कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील महिलांना पायपीट करावी लागत आहे.

चालू आठवड्यात पाण्याचा एकही थेंब एमआयडीसीकडून या गावात आलेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून अनेकजण ट्रॅक्टर वा टँकरचे पाणी विकत घेत आहेत. ज्यांना परवडत नाहीत, असे अनेक ग्रामस्थ घरातील भांडी व कपडे सुमारे दोन ते तीन किलोमीटर एवढी पायपीट करून पºयावर जात आहेत. मात्र, याबाबत कुणीही गंभीरपणे घेतले नाही.

आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास या गावांवर विस्थापित होण्याची वेळ आल्यास आश्चर्य वाटू नये. वाशिष्ठी नदीत पुरेसा पाणीसाठा होत नाही. झालाच तर महावितरणकडून वारंवार होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे नदीतील उपसा पंपहाऊसमध्ये करता येत नाही. पाण्याची जुनी असणारी लाईन अनेक ठिकाणी फुटत असल्याने त्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. एमआयडीसी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, तांत्रिक अडथळे असल्याने ही समस्या उद्भवल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले....तर कारखाने हवेत कशाला ?आमच्या जमिनी घेऊन आम्हाला भूमिहीन केलेत. त्याच जमिनीवर रासायनिक कारखाने उभारुन आमची शेती, फळबागा नामशेष झाल्या. जल व वायूप्रदूषणाने आरोग्यही धोक्यात आले. जलप्रदूषणामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत मृत झाले. एवढा अन्याय करुनही आम्हाला आता मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात असेल म्हणजेच पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होत नसेल तर ती एमआयडीसी आणि कारखाने हवेतच कशाला? आमच्या जिवावर उठलेल्या या संबंधितांना जाब विचारण्यासाठी आम्ही एमआयडीसी कार्यालयावर धडकणार आहोत, असे महिलांनी सांगितले.पाणीटंचाईचे संकटकाहीच दिवसांवर शिमगोत्सव येऊन ठेपलेला असून, त्यावरही पाणीटंचाईचे सावट कायम आहे. त्यातच लग्नसराई सुरु असल्याने त्यालाही या समस्येची झळ सोसावी लागत आहे. गावात घरे बांधणीची कामे पाण्याविना बंद होऊ लागली आहेत. सध्या केवळ पाणीटंचाईनेच हे गाव चर्चेत आले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी