शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलवर रिक्त पदे दिसावीत, अवघड क्षेत्र निश्चित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 10:31 IST

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत पोर्टलवर फक्त रिक्त पदे दिसण्याबरोबरच याच पदांवर बदल्या ...

ठळक मुद्देनिरंजन डावखरे यांची अभ्यासगटाकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत पोर्टलवर फक्त रिक्त पदे दिसण्याबरोबरच याच पदांवर बदल्या करण्याची कार्यवाही करावी. तसेच अवघड क्षेत्र ठरविण्याचे नियम शासननिर्णयात स्पष्ट करावेत, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज केली.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बदलीसंदर्भात अभ्यासगटाच्या कोकण भवन येथे झालेल्या बैठकीत आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अभ्यासगटाचे प्रमुख आयुष प्रसाद होते.बदल्यांमधील गोंधळ टाळण्यासाठी टिचर लॉगईनवरुन भरलेल्या फॉर्मचे स्कूल लॉग इन, क्लस्टर लॉगइन व बीईओ लॉगइन अशा तिन्ही लॉगइनवर करणे बंधनकारक करावे, अवघड क्षेत्रातील शिक्षकांचा संवर्ग २ मध्ये समावेश करावा, सध्याच्या संवर्ग १ मधील उपघटकांची संख्या कमी करावी, पती-पत्नी एकत्रीकरणासाठी वर्ग ४ निर्माण करावा. एकदा एकत्रीकरण झाल्यानंतर ठराविक काळ त्यांना स्थैर्य द्यावे, धोरण बदलणार असेल तर विस्थापित शिक्षकांना प्रथम प्राधान्य द्यावे, आदी मागण्या आमदार डावखरे यांनी आयुष प्रसाद यांच्याकडे केल्या.

अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र यानुसार बदली धोरण कायम ठेवायचे असेल, तर अवघड क्षेत्र ठरविण्याचे अधिकार शासन निर्णयात स्पष्ट करावेत. अन्यथा, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष राबविले जातात. त्यामुळे एकसूत्रीपणा राहत नाही. त्यामुळे शासन निर्णयातील निकषांनुसार फेर सर्वेक्षण करुन नव्याने अवघड क्षेत्र निश्चित करावे. समानीकरण ही प्रक्रिया बदल्यांमध्ये न राबविता संचमान्यता झाल्यानंतर होणाऱ्या समायोजन प्रक्रियेत राबवावी. समानीकरणासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेने व तालुक्याने वेगवेगळे निकष लावले होते. त्यात एकसूत्रीपणा यावा, असे आमदार डावखरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

नवीन सुधारीत बदली धोरणाचा शासन निर्णय हा सुस्पष्ट असावा, २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासननिर्णयात अनेक बाबींची सुस्पष्टता नसल्याने सुधारणा करावी, निव्वळ रिक्त पदांवरच बदल्या कराव्यात, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया २ टप्प्यात राबवावी, पहिल्या टप्प्यात तालुका बाह्य बदल्या या फक्त विनंतीने केवळ रिक्त पदांवर संगणकीय पद्धतीनेच कराव्यात. दुसऱ्या टप्प्यात बदलीपात्र शिक्षकांच्या विनंतीवर प्रशासकीय बदल्या तालुका अंतर्गत संगणकीय पद्धतीने कराव्यात आदी मागण्या आमदार डावखरे यांनी केल्या. 

टॅग्स :MLAआमदारRatnagiriरत्नागिरीonlineऑनलाइनTeacherशिक्षक