शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 17:57 IST

CoronaVirus Zp Ratnagiri : राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही. काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. राज्यात 18 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यापैकी एक रत्नागिरी जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षांना कोरोनाची लागणजिल्ह्यात येणाऱ्यांसाठी कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक

रत्नागिरी : राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही. काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. राज्यात 18 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यापैकी एक रत्नागिरी जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आलो होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कक्ष अधिकारी आणि स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी सर्वांना कोविड चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. रेड झोनमधील रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 'ब्रेक द चेन अंतर्गत' रत्नागिरी जिल्ह्यात दोन ते आठ जून या कालावधीत वैद्यकीय सेवा सोडून इतर सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद ठेवण्यास सह जिल्हा प्रवेश बंदी करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्ह्यात 2 जून 2021 पासून 8 दिवसाचे कडक लॉकडाऊन जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दोन जून ते आठ जून 2021पासून कडक लॉकडाऊन असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. केवळ अंत्यसंस्कार वैद्यकीय आणीबाणी यासाठी जिल्ह्यात प्रवेश करता येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आली आहे.दरम्यान, रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे 100 बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. चार ग्रामपंचायत आणि देवस्थान गणपतीपुळे यांनी मिळून हे 100 बेडचे आयसोलेशन सेंटर मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या अधिपत्याखाली सुरु केले आहे.

मालगुंड, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर या चार गावाच्या ग्रामपंचायती यांनी गणपतीपुळे देवस्थानचे भक्त निवास या ठिकाणी हे कोविड सेंटर सुरु केले आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले की, महिलांसाठी 40 बेड, पुरुषांसाठी 40 बेड आणि 20 बेड राखीव असे कोविड सेंटर आहे. यामध्ये लक्षणे नसलेली पण कोविड पॉझिटिव्ह असणारे रुग्ण ठेवले जाणार आहेत.देवस्थानच्या मार्फत बेड, गाद्या, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी