शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: नगराध्यक्ष निवडणुकीत आरोपांच्या फैरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 17:42 IST

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे.

रत्नागिरी: रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तर शिवसेना, शहर विकास आघडी व भाजप यांच्यात तेहरी लढत होण्याची शक्यता आहे. तर राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना मिलिंद कीर यांनी अनेक विकासकामे अडवून ठेवली. लाखो रुपये खर्चून अर्धवट स्थितीत बांधलेला शहरातील परटवणे पूल वापराविना पडून आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना पुलाचे काम आपण केल्याचे सांगणाऱ्या मिलिंद कीर यांनी अपूर्णावस्थेत असलेल्य पुलाची जबाबदारीही घ्यावी, रत्नागिरीकरांची दिशाभूल करू नये, असा टोला प्रभारी नगराध्यक्ष व नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  लगावला.

साळवी यांनी केलेल्या आरोपाला रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उत्तर दिले आहे. रत्नागिरी शहरातील पटवणे पुलाच्या बॉक्सचे ४६ लाखांचे काम ७ मार्च २०१३पर्यंत आपण नगराध्यक्ष असताना पूर्ण केले होते. तसेच उर्वरित कामासाठी ६० लाखांचे अंदाजपत्रकही तयार केले होते. मात्र, २०१६ पासून नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असताना थेट नगराध्यक्ष राहुल पंडित यांना विकासाची कामे करण्यामध्ये बंड्या साळवी यांनीच अडथळा केला. गेल्या ६ महिन्यांपासून साळवी यांनी कोणता विकास केला, हे दाखवून द्यावे, असा प्रतिहल्ला मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राज्यातील सत्तेच्या चाव्या हाती नसलेल्यांकडून जनतेला शहर विकासाच्या मोठ्या योजना दाखविल्या जात आहेत. आचारसंहितेपूर्वी कार्यादेश दिलेल्या रस्त्यांची कामे आम्ही पूर्ण केली आहेत. त्यामुळे जनता शिवसेनेच्याच पाठीशी राहील, असा विश्वास बंड्या साळवी यांनी व्यक्त केला. तर राहुल पंडित यांच्या नगराध्यक्षपद राजीनाम्यानंतर बंड्या साळवी हे गेल्या ६ महिन्यांपासून प्रभारी नगराध्यक्ष आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांनी केल्यानंतरही पुन्हा नगर परिषदेच्या निधीतून बुजविण्यात आले आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्यात आले, असा आरोप कीर यांनी केला आहे.