रत्नागिरी : गुहागर किनाऱ्यावर पकडली मगर, वनविभागाने सोडले धरणामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:53 PM2018-07-12T15:53:43+5:302018-07-12T15:56:29+5:30

गुहागर शहरातील वरचा पाट - भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मगर आली होती. त्या मगरीला स्थानिक तरुणांनी धाडसाने पकडले. त्यानंतर मगरीला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

Ratnagiri: caught on the coast of Guhagar, but forest department left the dam | रत्नागिरी : गुहागर किनाऱ्यावर पकडली मगर, वनविभागाने सोडले धरणामध्ये

रत्नागिरी : गुहागर किनाऱ्यावर पकडली मगर, वनविभागाने सोडले धरणामध्ये

Next
ठळक मुद्देगुहागर किनाऱ्यावर पकडली मगर वनविभागाने सोडले धरणामध्येस्थानिक तरूणांनी दाखवले धाडस

असगोली : गुहागर शहरातील वरचा पाट - भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मगर आली होती. त्या मगरीला स्थानिक तरुणांनी धाडसाने पकडले. त्यानंतर मगरीला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

समुद्रावर फेरफटका मारत असताना आरे गावातील तरुणांना साडेसात फूट लांबीची मगर दिसली. मगर वस्तीच्या दिशेने जात असल्याने वस्तीतील रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये व मगर सुरक्षित राहावी, यासाठी तरुणांनी तातडीने दोरीच्या सहाय्याने अनिकेत भोसलेने मगरीला पकडले. त्यानंतर पकडलेली मगर निखील सुर्वे, स्वराज देवकर, प्रणय भोसले यांच्या मदतीने वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली.

वन विभागाने या मगरीला गुहागर - चिपळूण मार्गावरील तांबी येथील धरणामध्ये सोडले. समुद्र चौपाटीवर सापडलेली मगर ही गुहागर तालुक्यातील आरे येथून येणाऱ्या नदीतून आली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Ratnagiri: caught on the coast of Guhagar, but forest department left the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.