शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रत्नागिरी : पाणी योजना ८ दिवसात मार्गस्थ, उदय सामंत, राहुल पंडित यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:06 IST

रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीकरांना दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी शहरात कोकणातील पहिला नाना-नानी पार्क उभारणारशहरात घनकचरा प्रकल्प उभारणीचा प्रयत्न उदय सामंत, राहुल पंडित यांची - विचार मंथन २०१८ कार्यक्रमात ग्वाही

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीकरांना दिली.नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यातर्फे शहरातील सर्वस्तरातील मान्यवरांना निमंत्रित करून वेध विकासाचा, रत्नागिरीच्या प्रगतीचा या विषयावरील विचारमंथन २०१८ कार्यक्रम रविवारी रात्री माळनाका, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.शहर विकासाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी, सूचना व नवीन कल्पनांचे स्वागत करून त्यातील योग्य सूचना, कल्पना शहर विकासासाठी राबविण्याकरिता हा अभिनव असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी नगरसेविका सुमिता भावे, ज्येष्ठ वकील बाबासाहेब परुळेकर, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते.या विचारमंथन उपक्रमात रत्नागिरी शहरातील अनेक विकासकामांबाबत उहापोह झाला. त्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी शहरातील रखडलेली पाणी योजना हा अत्यंत संवेदनशील विषय होता. वर्षभरापूर्वी मंजूर होऊनही या योजनेच्या कार्यवाहीत काही अडथळे आले आहेत.

मात्र, येत्या आठवडाभरात याप्रकरणी कोकण आयुक्तांसमोर सुनावणी होईल. या योजनेच्या कार्यवाहीतील सर्व अडथळे दूर होऊन येत्या आठवडाभरानंतर काम सुरू होईल, अशी ग्वाही यावेळी आमदार सामंत व नगराध्यक्ष पंडित यांनी उपस्थितांना दिली.रत्नागिरी शहरातील विविध विकासप्रश्नांबाबतच्या या विचारमंथन कार्यक्रमात मान्यवरांनी आपली परखड मते मांडली. कचऱ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी नगर परिषदेतर्फे जो स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम सुरू आहे, त्यानुसार पुढे कायम कचरा संकलनाची व्यवस्था राबविण्यात यावी, अशी सूचना मांडण्यात आली.

रत्नागिरी शहरातील पदपथांवर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे लोकांनी चालावे कूठून असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. ही अतिक्रमणे उठवून व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ (फूटपाथ) उभारणे अत्यंत आवश्यक असल्याची सूचना पत्रकार अलिमियाँ काझी यांनी केली.शवदाहिनी डिझेवरील असावीरत्नागिरी शहरात शवदाहिनी ही डिझेलवरील असावी, अशी सूचना उपस्थित मान्यवरांनी विचारमंथन कार्यक्रमात मांडली. डॉक्टर्स संघटनेतर्फेही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शवदाहिनी उभारण्याचा याआधीही प्रयत्न झाला. मात्र, परंपरेचा मुद्दा पुढे आल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.वनौषधी प्रकल्प होणाररत्नागिरी शहरात वनौषधींचा पथदर्शी प्रकल्प व्हावा, अशी संकल्पना मांडताना हा प्रकल्प व्हावा यासाठी डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रयत्न केले होेते. वनौषधी कोणत्या, त्यांचा उपयोग काय, याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. हा वनौषधी प्रकल्प येत्या वर्षभरामध्ये रत्नागिरी शहरात साकार होईल, अशी ग्वाही आमदार उदय सामंत यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीWaterपाणी