शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

रत्नागिरी : आंब्याची ७५ टक्के आवक घटली,  गुढीपाडव्याला शेतकऱ्यांनी केली आंबातोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:33 IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात्र, रविवार असल्याने मार्केटला सुटी होती, त्यामुळे विक्री झालीच नाही. मात्र, सोमवारी दहा हजार पेट्या विक्रीला आल्या.

ठळक मुद्देगतवर्षी याचदिवशी वाशी मार्केटला ६० हजार पेट्या विक्रीलाशेतकऱ्यांकडील आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता

रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला.

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात्र, रविवार असल्याने मार्केटला सुटी होती, त्यामुळे विक्री झालीच नाही. मात्र, सोमवारी दहा हजार पेट्या विक्रीला आल्या. दोन्ही दिवसांच्या मिळून १५ हजार पेट्या विक्रीसाठी आल्या होत्या. गतवर्षी याच दिवशी ६० हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादन यंदा ७५ टक्क्यांनी आवक घटली आहे.मे महिन्याप्रमाणे उष्म्याच्या झळा मार्चपासून सोसाव्या लागत आहेत. रत्नागिरीत ३३ अंश सेल्सिअस कमाल, तर २६ अंश किमान तापमान असल्यामुळे ह्यफळांचा राजाह्ण तयार होऊ लागला आहे. उष्म्यामुळे काही ठिकाणी आंब्यावर काळे डाग पडत आहेत. त्यामुळे या भाजलेल्या आंब्याला मागणी नाही.

शिवाय कैरीदेखील गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उष्णतेमुळे आंबा गळून पडण्याचा धोका वाढला आहे. कातळावरील बागांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कातळ तापत असल्यामुळे आंब्याचा दर्जा घसरण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकरी झाडांना पाणी देत आहेत.उष्णतेमुळे आंबा भाजण्याचे, गळ होण्याचे प्रमाण वाढले, त्याचप्रमाणे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. वास्तविक यावर्षी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गतवर्षी गुढीपाडव्याला ६० हजार पेट्या विक्रीला उपलब्ध होत्या. मात्र, यावर्षी दोन दिवसात १५ हजार पेट्या विक्रीसाठी आल्या.

सध्या १५०० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. यावर्षी आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे शेतकऱ्यां नी आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणेही अवघड झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबाकाढणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांकडील आंबा हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता अधिक आहे.कोकणाबरोबर परराज्यातूनही आंबा तितक्याच प्रमाणात विक्रीला येत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमधून दररोज आंब्याची आवक होत आहे. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीसाठी येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत असून, हापूस ५० ते १०० रूपये किलो, लालबाग २० ते ३५ रूपये किलो, तोतापुरी २० ते ३० रूपये किलो, गुहा २० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. तर कोकणातील हापूस आंबा डझनावर विकण्यात येत आहे.शासनाने दलालांची हमाली बंद केल्याने त्याचा परिणाम गतवर्षीपासून आंबा विक्रीवर झाला आहे. वाशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या आंब्याला फारसा दर मिळत नाही. मात्र, उपनगरांमध्ये होच आंबा अधिक किंमतीने विकण्यात येत आहे. कर्नाटक हापूसची कोकणचा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. चौथ्या टप्प्यातील आंबा झाडावर आहे. मात्र, त्याचे प्रमाणही अल्पच आहे. तसेच उष्म्यामुळे तो कितपत टिकेल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.अत्यल्प प्रमाणयावर्षी ओखी वादळ, अवकाळी पाऊस, पुनर्मोहोर, वाढता उष्मा यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला. बहुतांश शेतकऱ्यांनी आंबा अधिक प्रमाणात नसल्यामुळे आपल्याकडील नेपाळी कामगारांना परत पाठवले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होऊन बाजारात येऊ लागला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

टॅग्स :fruitsफळेRatnagiriरत्नागिरी