शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रमेश मोरे, जया जाधव यांच्या खुनाला वाचा फोडणार - नारायण राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 12:27 IST

माझ्याइतकी उद्धव ठाकरे यांची कुंडली कोण सांगू शकेल, असा प्रश्न त्यांनी केला.

राजापूर : रमेश मोरे व जया जाधव यांच्या खुनाला कारणीभूत कोण आहे, याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह जाहीर करणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. दिशा सालियन व सुशांतसिंह राजपूत यांचा खूनच झाला आहे, असा आरोप पुन्हा एकदा करत त्यांनी येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत हे तुरुंगात जातील, असे सूतोवाचही केले.सोमवारी सायंकाळी राजापूर हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या भाजपच्या मोदी ॲट ९ या महाजनसंपर्क अभियानाची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील समारोपाची सभा झाली. त्यात ते बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, बांधकाममंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.केंद्रीय मंत्री राणे यांनी ठाकरे शिवसेनेवर कडाडून टीका केली. मी ३९ वर्षे शिवसेनेत काढली आहेत आणि मी कायम ‘मातोश्री’च्या आत होतो. त्यामुळे माझ्याइतकी उद्धव ठाकरे यांची कुंडली कोण सांगू शकेल, असा प्रश्न त्यांनी केला. रमेश मोरे व जया जाधव यांच्या खुनाचे खरे सूत्रधार कोण, हे मला चांगलेच माहिती आहे. लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.या सभेत आमदार नितेश राणे, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, मंत्री रवींद्र चव्हाण यांचीही भाषणे झाली.उरलेसुरलेही संपतीलआता शिवसेना संपली आहे. त्यांचा जास्त विचार करू नका. आता केवळ ५ खासदार व १५ आमदार उरले आहेत. येत्या निवडणुकीत तेही नसतील. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांमधील विजयासाठी मतांच्या बेरजेचे गणित करा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले.लवकरच तुरुंगात जातीलअडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले. त्यांनी लोकहिताचे काय निर्णय घेतले, असा प्रश्न करतानाच त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले. दिशा सालियन व सुशांतसिंह राजपूत यांची हत्याच झाली आहे व त्याचे पुरावे आपण संबंधित यंत्रणांना दिले आहेत, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNarayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊत