शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 09:33 IST

शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

दापोली- 

शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. "सारखं बोलता मी बाळासाहेबांचा मुलगा, बाळासाहेबांचा मुलगा... पण आम्ही कुठं नाही म्हणतोय...संशय आहे का?", अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचंही ते म्हणाले. 

"मी उद्धव ठाकरेंना सांगेन की शिवसेना तुम्ही नाही उभी केली. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झालेत. तुमचं काय योगदान? वारंवार सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तू त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का?", अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली. 

सोनियांच्या नादी लागू नका"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चल तुझ्यासोबत मी आहे असं बाळासाहेब आज वरुन सांगत असतील", असंही रामदास कदम म्हणाले. 

आदित्य ठाकरेंनी आधी लग्न करावंरामदास कदम यांनी यावेळी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला. "जगातला पहिला प्लास्टिक बंदीचा कायदा मी केला. जसा कायदा केला तसं आदित्य टूनटून उड्यामारुन मी केला, मी केला म्हणून ओरडू लागले. अरे तू काय केलं. तू अजून लग्न केलं नाही तू काय करणार आहेस. बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला याला खरी गद्दारी म्हणतात", असं रामदास कदम म्हणाले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे