शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापूरचे रेल्वे स्थानक चकाचक, प्रवासी मात्र वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:13 IST

डिजिटल एलईडी लाईटचे बोर्ड बसवले. मात्र, या बोर्डमधील वीज बंद

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील काही स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये राजापूर स्थानकाचाही समावेश आहे. सुमारे ४ कोटी खर्च करून रेल्वे स्थानकाचे सुशाेभीकरण केले आहे. मात्र, दोन महिन्यांतच या स्थानकाच्या नावाचे बोर्ड खराब झाले आहेत. तसेच, चेहरा मोहरा बदललेल्या स्थानकात अनेक गाड्यांना थांबाच नसल्याने येथील प्रवासी अजूनही वाऱ्यावरच आहेत. ‘स्थानक सुधारले, पण प्रवासी वाऱ्यावर’ अशी अवस्था सध्या झाली आहे.कोकण रेल्वे मार्गावर जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि खेड नंतर महत्त्वाचे स्थानक म्हणजे राजापूर रोड स्थानक आहे. त्याव्यतिरिक्त सौंदळ येथे हॉल्ट स्थानक असून, तेथे केवळ दिवा - सावंतवाडी ही एकमेव पॅसेंजर एक ते दोन मिनिटे थांबते. कोराेनाआधी रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर सुरु होती. या गाडीला साैंदळ थांबा होता. मात्र, काेराेना काळात ही गाडी बंद झाली. ती काही पुन्हा सुरू झालेली नाही.

राजापूर शहरापासून सुमारे पंधरा ते वीस किलाेमीटर अंतरावर राजापूर रोड रेल्वेस्थानक आहे. या स्थानकात मांडवी, कोकणकन्या आणि तुतारी या नियमित एक्स्प्रेससह उधना, नागपूर आणि अलीकडे सुरू झालेली थिविम, अहमदाबाद या गाड्यांसह दिवा - सावंतवाडी ही पॅसेंजर याठिकाणी थांबते. उर्वरित गाड्यांना थांबे नाहीत. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. वारंवार मागणी करुनही अन्य गाड्यांना थांबा दिला जात नसल्याने स्थानक चकाचक पण प्रवासी वाऱ्यावर अशीच स्थिती निर्माण झाली आहे.या रेल्वेस्थानकाचे सुशाेभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरणात स्थानकाच्या दर्शनी गेटवर डिजिटल एलईडी लाईटचे बोर्ड बसवले आहेत. मात्र, या बोर्डमधील वीज बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजापूर या अक्षरातीलच वीज खराब झाल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरrailwayरेल्वेpassengerप्रवासी