ओणी येथील मसाले कंपनीला राजन साळवी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:36+5:302021-08-24T04:35:36+5:30
राजापूर : तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गटामधील उद्योजक शांताराम यशवंत शेडेकर यांचे चिरंजीव गिरीश शेडेकर यांच्या यशपूर्णा फाईन फुड्स ...

ओणी येथील मसाले कंपनीला राजन साळवी यांची भेट
राजापूर : तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गटामधील उद्योजक शांताराम यशवंत शेडेकर यांचे चिरंजीव गिरीश शेडेकर यांच्या यशपूर्णा फाईन फुड्स प्रायव्हेट लिमिटेड (मसाले कंपनी)ला आमदार राजन साळवी यांनी भेट दिली.
शेडेकर कुटुंबाने आपल्या गावातील स्थानिक मुलांना रोजगार मिळावा, या हेतूने ‘फुगडी मसाले’ नावाने ही कंपनी सुरू केली आहे. कळसवली, ओणी भागातील कामगारांना यामुळे रोजगार प्राप्त झाला आहे. आमदार राजन साळवी यांनी कंपनीला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती करुणा कदम, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, तात्या सरवणकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, माजी शिक्षण व अर्थ सभापती शरद लिंगायत, विभागप्रमुख वसंत जड्यार, नरेश दुधवडकर, कमलाकर कदम, ग्रामस्थ, शिवसैनिक उपस्थित होते.