राजन साळवी यांनी घेतला काेराेनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST2021-04-17T04:31:38+5:302021-04-17T04:31:38+5:30

राजापूर : कोविड - १९ आजाराच्या अनुषंगाने मतदार संघामध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी लांजा तहसीलदार कार्यालय व राजापूर ...

Rajan Salvi reviewed Kareena | राजन साळवी यांनी घेतला काेराेनाचा आढावा

राजन साळवी यांनी घेतला काेराेनाचा आढावा

राजापूर : कोविड - १९ आजाराच्या अनुषंगाने मतदार संघामध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी लांजा तहसीलदार कार्यालय व राजापूर तहसीलदार कार्यालय येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे येथील कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला.

तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे फाऊंडेशनच्या सहकार्याने मिळालेली रुग्णवाहिका कोविड -१९ साठी राजापूर तहसीलदार कार्यालय येथे सुपूर्द करण्यात आली. या बैठकीला लांजा तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे, पाेलीस निरीक्षक अनिल गंभीर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, गणेश लाखन उपस्थित हाेते. राजापूर येथील बैठकीला तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी साबळे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी मेस्त्री, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, तात्या सरवणकर उपस्थित होते.

Web Title: Rajan Salvi reviewed Kareena