मुंबईत आरक्षण लढा उभारावा : झेपले
By Admin | Updated: January 29, 2015 00:05 IST2015-01-28T22:09:39+5:302015-01-29T00:05:57+5:30
२५ हजार लोकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे काढण्यात आला. मात्र,

मुंबईत आरक्षण लढा उभारावा : झेपले
देवरुख : मुंबईत असलेल्या कुणबी समाजाने आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन प्रचंड लढा मुंबईत उभा करावा, असे आवाहन कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपीनाथ झेपले यांनी परळ येथील मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली १२ आॅगस्ट २०१४ रोजी २५ हजार लोकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे काढण्यात आला. मात्र, त्यानंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील एकही आमदार कुणबी समाजाच्या आरक्षणाबाबत बोलत नाही. म्हणूनच, आपला लढा मुंबईत उभा करणे काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन मेळाव्यात एक अस्थायी कमिटी मुंबईत निर्माण करण्यात आली.निमंत्रक म्हणून विकास नारकर यांची तर सदस्य म्हणून रमेश काजरेकर, ज्ञानेश्वरा घेवडे, मनोहर डोंगरे, चंद्रकांत पाष्टे, दत्ताराम बंडबे, संतोष पातेरे, कमलकार घवाळी, भरत घाणेकर, किरण प्रिंदावणकर, उमेश धामणे, अमित लाखण, मोरेश्वर पाष्टे, संतोष पाष्टे, दत्ताराम साप्ते, दिपक जाधव, रमेश आगरे, रामचंद्र गोताड, अनंत जुवळे, संजय घडशी, विठोबा डोंगरे याची नेमणूक करण्यात आली. मुंबईतील कुणबी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक उपनगरात संघर्ष समिती निर्माण करुन, काम उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्यात मंडणगड येथील राजेश धामणे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विकास नारकर यांनी केले तर आभार संतोष पातेरे यांनी मानले. (प्रतिनिधी)