शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : रायपाटण रूग्णालय मृत्यूशय्येवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:28 IST

पाचल परिसरात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे कटू सत्य अधोरेखित झाले आहे. रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांमुळे मृत्यू शय्येवर पडले असून याठिकाणी गेली दोन वर्षे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.

ठळक मुद्देरायपाटण रूग्णालय मृत्यूशय्येवर, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडणार

पाचल : पाचल परिसरात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे कटू सत्य अधोरेखित झाले आहे. रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांमुळे मृत्यू शय्येवर पडले असून याठिकाणी गेली दोन वर्षे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.येथील अनेक असुविधांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याने स्थानिक गोरगरीब रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याकडे प्रशासन व या भागातील लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे.रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३० ते ४० गावांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र्राशिवाय येथे अन्य कोणतीही सुविधा नसल्याने रुग्ण मेटाकूटीस येत आहेत. हा संपूर्ण भाग अत्यंत दुर्गम आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना केवळ रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचाच मोठा आधार आहे.येथील अपुऱ्या असुविधांमुळे वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्णांना मिळत नाही. या रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असून सध्या या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र रुग्णसेवेचा संपूर्ण भार एकट्यावरच पडत आहे. त्यामुळे रुग्णालयाला किमान तीन वैद्यकीय अधिकारी तातडीने देण्याची गरज आहे.या रुग्णालयाच्या दोन्ही इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक बनल्या आहेत. या सर्व गैरसोयींकडे आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे बिलकूल लक्ष नाही. त्यामुळे परिसरातून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या असुविधांकडे प्रशासन व या भागातील लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष न दिल्यास याविरोधात प्रचंड जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे.पदे रिक्तच रिक्तएकूण सातपैकी सध्या केवळ तीन नर्स कार्यरत आहेत. तीन लिपिकाची पदे रिक्तच आहेत. क्ष किरण तज्ज्ञांचे पद गेली पाच वर्षे रिक्त आहे. तसेच समुपदेशक व लॅब तंत्रज्ञ ही दोन्ही पदेही रिक्त आहेत. औषध निर्माता व दंततज्ज्ञ ही पदे आजपर्यंत कधीही भरलेली नाहीत.सडकी यंत्रणातंत्रज्ञ नसल्याने सोनोग्राफी मशीन चार वर्षे सडत आहे. त्यामुळे त्यांचा रुग्णांना लाभ मिळत नाही. परिणामी रुग्णांना खाजगी सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMNSमनसेRatnagiriरत्नागिरी