शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

रत्नागिरीत पावसाने घेतली विश्रांती, आठवडाभरानंतर झाले सूर्यदर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:08 IST

रत्नागिरी : गुरुवारी सकाळपासूनच पावसाने पूर्णपणे विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळी कडकडीत ऊन पडल्याने वातावरण आल्हाददायी वाटत होते. ...

रत्नागिरी : गुरुवारी सकाळपासूनच पावसाने पूर्णपणे विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळी कडकडीत ऊन पडल्याने वातावरण आल्हाददायी वाटत होते. आठवड्यानंतर नागरिकांना सूर्यदर्शन झाले. जिल्ह्यात राजापूर, खेड, चिपळूण या तालुक्यांमधील पाणी ओसरले असून, जनजीवन सुरळीत झाले आहे. या कालावधीत पडलेल्या पावसामुळे पावसाची घटलेली आकडेवारी वाढण्यास मदत झाली.१३ ऑगस्टपासून पावसाने जिल्हाभरात संततधार धरली होती. सलग सुरू झालेल्या या अतिवृष्टीमुळे राजापूर, चिपळूण, खेड आदी तालुक्यांना अधिक फटका बसला. तेथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. पावसाची दिवसरात्र संततधार सुरू होती. जोडीला वाऱ्याचा जोर असल्याने अनेक घरांचे, गोठ्यांचे तसेच इतर मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रस्ते खचणे, दरड कोसळणे आदी प्रकारांमध्येही वाढ झाली होती. दरडप्रवण आणि पूरप्रवण भागातील ४४ कुटुंबांतील ११७ लोकांचे स्थलांतर करण्यात आले.गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. त्यानंतरही काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम व हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४४२ मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७२.५८ टक्के पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.