जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST2021-09-22T04:35:12+5:302021-09-22T04:35:12+5:30
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी रात्री ...

जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी दिवसभर पाऊस राहील, अशी शक्यता वाटत होती. मात्र, सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. बुधवारी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१५.१९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट महिन्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने सव्वातीन महिन्यांतच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. अजूनही पावसाची वाटचाल जोरात सुरू आहे. सध्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारीही पावसाचा जोर होता. सोमवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री मात्र जोरदार सुरुवात केली. मंगळवारी पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे दिवसभर हा जोर राहणार असे वाटत होते.
सकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी आभाळ भरलेले होते. त्यामुळे पाऊस जोरदार असणार, अशी शक्यता वाटत होती. हवेत गारवाही होता. मात्र, दिवसभर रिपरिपच सुरू होती. पावसाळी वातावरण कायम होते. दिवसभरात उन्हाचे दर्शनही झाले नाही. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली. सध्या काही दिवस तरी मान्सूनचा पाऊस सक्रिय राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
सध्या सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस किरकोळ सरींनी पडत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६९१,१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची चिन्हे पाहता अजूनही काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार, असे दिसू लागले आहे.