शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 20:56 IST

वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाळी वातावरण होते.

लांजा/राजापूर : वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाळी वातावरण होते.बुधवारी सायंकाळी ५ वाजता ढगांच्या गडगडाटसह अवकाळी गाराचा पाऊस लांजा तालुक्यातील पश्चिम भागात कोसळला. तसेच लांजा शहरातदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. जवळपास २० मिनिटे  पाऊस कोसळत होता. जमिनीवर पडलेल्या गारा जमा करण्यासाठी बच्चे कंपनी पावसाचा आनंद लुटत होती.राजापूर तालुक्यातील पूर्व भागातदेखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पाचल परिसरात कोसळलेल्या सरींमुळे अनेकांची धावपळ उडाली होती. बाजारात आलेल्या नागरिकांचीदेखील धांदल उडाली होती. अवकाळी पडलेल्या या पावसामुळे काजू  आंबा बागायतदार यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.  बुधवारी पडलेल्या पावसामुळे आंबा डागाळू शकतो. काजूची देखील हीच अवस्था झाल्याने सर्वसामान्य शेतक-यांवर आसमानी संकट ओढवले आहे .

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी