शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कर्दे समुद्रकिनारी स्टंटबाजी आली पुण्यातील पर्यटकांच्या अंगाशी, नियंत्रण सुटल्याने कार उलटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:51 IST

गाडीतील काहीजण बाहेर फेकले गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

दापोली (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी पर्यटकांचा बेफामपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. समुद्रकिनारी सुसाट वेगाने गाडी पळवून स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. हा प्रकार गुरुवारी (दि. ११) सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमाराला घडला. ही गाडी पुणे येथील पर्यटकांची असून, सुदैवाने यामध्ये काेणालाही दुखापत झालेली नाही. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटक कुटुंबासह फिरण्यासाठी आलेले असताना गुरुवारी सायंकाळी एक थार (क्र. एमएच १२, एक्सटी १७८८) गाडी भरधाव वेगाने समुद्रकिनाऱ्यावरून धावत हाेती. या गाडीचा वेग इतका भयानक हाेता की, गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी किनाऱ्यावर उलटली. या गाडीतील काहीजण बाहेर फेकले गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र या प्रकारामुळे किनाऱ्यावरील पर्यटकांच्या अंगाचा थरकाप उडाला हाेता.या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी पाेहाेचून जेसीबीच्या साहाय्याने गाडी किनाऱ्यावर आणली. मात्र, या प्रकारामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली असून, स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सूचना देऊनही पर्यटकांचे दुर्लक्षदापाेली तालुक्यातील कर्दे, हर्णै आणि आसपासच्या किनाऱ्यांवर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, काही बेपर्वा पर्यटक नियमांचे उल्लंघन करून गाड्या समुद्रकिनारी आणतात आणि धोकादायक स्टंट करतात. यामुळे अपघातांची शक्यता वाढते. या आधीही अशा घटना घडल्या असून, वारंवार सूचना देऊनही काही पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

कडक कारवाईची गरजपर्यटकांचे जीव वाचवण्यासाठी आणि अशा बेपर्वा वर्तनावर आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी हाेत आहे. तसेच किनाऱ्यावर सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.