दिव्यांगांसाठी यंत्रणा सज्ज ,, संस्थांकडून २४४ व्हीलचेअर्स उपलब्ध -- जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:52 IST2019-04-18T15:49:56+5:302019-04-18T15:52:11+5:30
जिल्ह्यातील ४३९६ दिव्यांग व्यक्तिंना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून, या कामासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी

दिव्यांगांसाठी यंत्रणा सज्ज ,, संस्थांकडून २४४ व्हीलचेअर्स उपलब्ध -- जिल्हाधिकारी
रत्नागिरी : जिल्ह्यातील ४३९६ दिव्यांग व्यक्तिंना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून, या कामासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. याअंतर्गत ज्या केंद्र्रांवर दिव्यांग मतदार आहेत. या अंतर्गत, ज्या केद्र्रांवर दिव्यांग मतदार आहेत, अशा केंद्रांची स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली होती. दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना यावेळी PWD अॅपद्वारे नोंदणी करुन मतदानासाठी जाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या सर्व दिव्यांग मतदारांप्रमाणेच ज्येष्ठ मतदारांना रांगेशिवाय थेट मतदान करता येणार आहे. ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर आणणे व परत घरी सोडणे, यासाठी स्वतंत्र वाहने ठेवण्यात आली आहेत. दिव्यांगांना केंद्रात जाणे शक्य व्हावे, यासाठी उद्योजकांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी २०० व्हीलचेअर प्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्योजकांचे विशेष आभार मानले आहेत.
या २०० व्हीलचेअर्स सोबत रत्नागिरी नगर परिषदेने ४४ व्हीलचेअर्स खरेदी केल्या. त्यामुळे एकूण २४४ व्हीलचेअर्स प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या २० तीनचाकी सायकली यासाठी वापरल्या जाणार आहेत. या साधनांमुळे जिल्ह्यातील ७५८ मतदान केंद्र्रांवर असणाऱ्या ४३९६ दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ होईल, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी प्रचारात - कार्यालयात शुकशुकाट - कर्मचारी निवडणुकीच्या कामात मग्न
रत्नागिरी : लोकसभा निवडणूक असल्याने जिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी व सदस्य प्रचारात गुंतले आहेत. त्याचबरोबर अधिकारीही निवडणुकीच्या कामात गुंतले असून, परिषद भवनात शुकशुकाट असतो. जिल्हा परिषदेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. विरोधी पक्ष असला तरी पुरेसे सत्ताबळ सेनेकडे असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेची पाळेमुळे अगदी खोलवर रुतलेली आहेत. तरीही शिवसेनेकडून या निवडणुकीमध्येही जोर लावण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाºयांवर या निवडणुकी निमित्ताने जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणामध्ये बैठका, सभा घेण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त मते मिळावीत तसेच यावेळीही पक्षाला मतदान वाढावे, त्यादृष्टीने शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत.
लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाºयांनी व सदस्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारी, सदस्य आपला गट कार्यकर्त्यांना घेऊन पिंजून काढत आहेत. त्यामुळे परिषद भवनाकडे पदाधिकारी, सदस्यांनी पाठ फिरवली असून, संपूर्ण लक्ष निवडणुकीवर ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रत्येक अधिकारी तसेच कर्मचाºयांना घेण्यात आलेले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी निवडणूक विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असतात. तसेच निवडणुकी निमित्ताने कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षणेही देण्यात येत आहेत.
त्यामुळे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने ते कार्यालयात कमीच असतात. पदाधिकारी, अधिकारी निवडणुकीमध्ये गुंतल्याने गेले कित्येक दिवस परिषद भवनामध्ये शुकशुकाट असतो. त्याचबरोबर राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही प्रचारात गुंतल्याने त्यांचीही परिषद भवनातील रेलचेल कमी असते. त्यामुळे नेहमीच गजबजलेले जिल्हा परिषद सध्या सुनेसुने दिसत आहे.